Dhule Lok Sabha Election : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २०) मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत १.२१ टक्क्यांची वाढ होत सरासरी ६०.२१ टक्के मतदान झाले. यंदा वंचित बहुजन आघाडी, एमआयएम पक्ष रिंगणात नसल्यामुळे मुस्लिम समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण टळले. परिणामी, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारामध्ये अटीतटीची लढत होत आहे. ( 60 percent voting for Dhule Lok Sabha election in district )
धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख २२ हजार ६१ मतदार आहेत. पैकी १२ लाख १७ हजार ५२३ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी सरासरी ६०.२१ टक्के आहे. धुळे लोकसभा मतदारसंघांतर्गत धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण अशी सहा विधानसभा क्षेत्रे आहेत.
एकूण दहा लाख ५१ हजार ९२८ पुरुष मतदार, तर नऊ लाख ७० हजार ८६ महिला मतदार आहेत. यात तीन लाख ९३ हजार ७९१ पुरुषांनी, तर चार लाख १० हजार ७१५ महिला, ३२ इतर मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. ही संख्या एकूण आठ लाख चार हजार ५३८ आहे.
मतदानाचा हक्क
निवडणुकीत सहा लाख ५८ हजार १३७ पुरुष, तर पाच लाख ५९ हजार ३७१ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच इतर पंधरा जणांनी मतदान केले. निवडणुकीत सकाळी सात ते सायंकाळी सहा या निर्धारित कालावधीत एकूण १२ लाख १७ हजार ५२३ महिला व पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हे प्रमाण पुरुषांचे ६२.५६ टक्के, तर महिलांचे ५७.६६ टक्के आहे.
मालेगाव मध्य
मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६८.०४ टक्के मतदान झाले. तेथे सरासरी तीन लाख दोन हजार ३९१ मतदार आहेत. पैकी पुरुष एक लाख ५७ हजार ५१२, तर महिला एक लाख ४४ हजार ८७१ मतदार आहेत. या मतदारसंघात पुरुषांनी सर्वाधिक ७०.७८ टक्के मतदान केले. तसेच ६५.०८ टक्के महिलांनी मतदान केले. ही टक्केवारी इतर मतदारसंघांच्या तुलनेत सरस ठरली. (latest marathi news)
मालेगाव बाह्य
मालेगाव बाह्य मतदारसंघात तीन लाख ६० हजार ८१५ मतदार आहेत. पैकी दोन लाख दहा हजार ७७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या प्रमाणात ६०.९३ टक्के पुरुषांनी, तर ५५.६४ टक्के महिलांनी मतदान केले. बाह्य मतदारसंघात अवघ्या ९५ हजार ३३७ महिलांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले.
बागलाण मतदारसंघ
बागलाण मतदारसंघात दोन लाख ८९ हजार ६९१ मतदार असून, पैकी एक लाख ८६ हजार ११९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात सरासरी ६७.०१ टक्के पुरुष, तर ६१.२० टक्के महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात ८४ हजार ३९५ महिलांना मतदानाचे कर्तव्य पार पाडले.
धुळे शहर
सर्वांत कमी मतदान धुळे शहरात ५४.३६ टक्के झाले. धुळ्यातील एकूण तीन लाख ४३ हजार ८२१ मतदारांपैकी एक लाख ८६ हजार ८८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ५६.८२ आहे, तर शहरात ८४ हजार ८४६ महिलांनी मतदान केले. ही टक्केवारी एकूण मतदानाच्या ५१.६६ टक्के आहे.
धुळे ग्रामीण
धुळे ग्रामीण मतदारसंघात तीन लाख ९३ हजार ४९८ मतदार असून, दोन लाख ३८ हजार ५१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ६२.५०, तर महिलांची टक्केवारी ५८.५८ टक्के आहे. मतदारसंघात एक लाख ११ हजार ४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
शिंदखेडा मतदारसंघ
शिंदखेडा मतदारसंघात तीन लाख ३१ हजार ८४५ मतदार असून, एक लाख ८९ हजार ४७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ५८.९५, तर महिलांची ५५.१६ टक्के आहे. यात ८९ हजार ४७२ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.
लोकसभा ः विधासभा मतदारसंघनिहाय स्थिती
मतदारसंघ..........एकूण झालेले मतदान.........टक्केवारी
धुळे ग्रामीण.........२,३८,५१२...................६०.६१
धुळे शहर...........१,८६,८८४...................५४.३६
शिंदखेडा............१,८९,४७५...................५७.१०
मालेगाव मध्य.......२,०५,७५९..................६८.०४
मालेगाव बाह्य.......२,१०,७७४..................५८.४२
बागलाण.............१,८६,११९..................६४.२५
एकूण मतदान........१२,१७,५२३................६०.२१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.