farmer money esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule: शेतकऱ्यांच्या खात्यांत 66 कोटी 46 लाख! कापूस, सोयाबीन अर्थसहाय्याचा जिल्ह्यात पहिला हप्ता वितरित; संमतिपत्र, E KYCचे आवाहन

Latest Dhule News : धुळे जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना ३० सप्टेंबर २०२४ ला ६६ कोटी ४६ लाखांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : सन २०२३ च्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीनला कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीवर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी पाच हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्‍टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला. यात धुळे जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना ३० सप्टेंबर २०२४ ला ६६ कोटी ४६ लाखांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली. (66 crores 46 lakhs in farmers accounts)

धुळे जिल्हात खरिपात एकूण पेरणीखालील सर्वसाधारण क्षेत्र ३.८३ लाख हेक्टर असून, यात कापूस पिकाखाली साधारण २.३१ लाख, तर सोयाबीन पिकाखाली ०.१६५ लाख हेक्‍टर असे एकूण २.४७५ लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. २०२३ च्या खरीप हंगामात ई-पीकपाहणीत कापूस व सोयाबीनची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने प्रतिहेक्टर पाच हजार रुपये (दोन हेक्‍टरच्या मर्यादेत) मदत देऊ केली आहे. ही मदत कापूस व सोयाबीन पिकांसाठी वेगवेगळी आहे.

मदतीची सद्यःस्थिती अशी

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी खातेदारांची संख्या दोन लाख ७० हजार ७३५, क्षेत्रीय स्तरावर प्राप्त खातेदारांचे संमतिपत्र एक लाख ७० हजार ७२०, तर पोर्टलवर खातेदार डाटा पूर्ण एक लाख ६७ हजार २१९ अशी स्थिती आहे. एकूण कापूस, सोयाबीन उत्पादक अनुदान वितरण शेतकऱ्यांची संख्या एक लाख ५० हजार २३९ आहे.

दरम्यान, ३० सप्टेंबर २०२४ ला आर्थिक मदतीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल ६६ कोटी ४६ लाख दोन हजार ११ रुपये वितरित करण्यात आले. यात कपाशीसाठी ५८ कोटी ७२ लाख, तर सोयाबीन पिकासाठी सात कोटी ७३ लाख रुपयांचा समावेश आहे.

गावात राहणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांचे आधार संमती दिली आहे. यात अनेक खातेदार नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी आहेत. त्यांचे आधार संमती मिळत नाही. काही खातेदार मृत झाले आहेत, त्यांच्या वारस नोंदी अपूर्ण आहेत. सामाईक खातेदारांची एका नावावर संमती होत नाही तसेच काही संमती देत नाहीत, तर काही गावाबाहेर राहतात.

अशा कारणांमुळे उर्वरित आधार माहिती अपूर्ण आहे. ते जसजसे येतील तशी त्यांना मदत देण्याची कार्यवाही सुरू राहील. ज्या खातेदारांची खरीप-२०२३ मध्ये कापूस व सोयाबीनची लागवड होती. मात्र, त्यांचे नाव ई-पीकपाहणी यादीत आले नाही, त्यांची नावे तलाठ्यांकडून घेऊन त्यांना मदत देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. वनपट्टेधारकांच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रमाणित करून दिलेल्या खातेदारांची नोद घेण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे नमूद केले आहे. (latest marathi news)

...तर संपर्क साधा

दरम्यान, कापूस व सोयाबीन पिकाच्या अर्थसहाय्यासाठी शेतकऱ्यांनी संमतिपत्र सादर करावे व ई-केवायसी तत्काळ करून घ्यावी. जेणेकरून अर्थसहाय्यक आधार लिंक खात्यात वर्ग होईल. अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

तालुकानिहाय मदत अशी

तालुका...कापूस पीक मदत...सोयीबीन पीक मदत...एकूण मदत

धुळे.............२०८७८९७०१...२२८५५४५...२११०७५२४६

साक्री............७९३५५५८४...७१२६६१४२...१५०५८१७२६

शिरपूर...........१०७८१५१६२...२८२१८५०...११०६३७०१२

शिंदखेडा........१९१२८५७७७...१०२२२५०...१९२३०८०२७

एकूण...५८७२४६२२४...७७३९५७८७...६६४६०२०११(रुपये)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT