Municipal team while collecting fine from pantapari holder for finding tobacco products, scented betel nuts. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळ्यात 99 पानटपरीधारक, विक्रेत्यांना दंड

Dhule : धुळे शहरातील एकूण ९९ पानटपरी तथा विक्रेतेधारकांवर प्रत्येकी २०० रुपये, याप्रमाणे एकूण १९ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत धुळे महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांच्या पथकांनी आपापल्या भागात ज्या पानटपरीवर तंबाखूजन्य पदार्थ, सुगंधित सुपारी आढळून आली अशा पानटपरीधारक, विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली. दिवसभरात पथकांनी शहरात ९९ टपरीधारकांवर अशी कारवाई करत त्यांच्याकडून प्रत्येकी दोनशे रुपये दंड वसूल केला. (Dhule 99 pan tapri holders in city dealer fined)

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कोटपा-२००३ कायद्यांतर्गत धुळे शहरात कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याबाबत शासनाकडून तंबी मिळाल्यानंतर धुळ्यात महापालिकेकडून कारवाई सुरू करण्यात आली.

धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील पानटपरी व तंबाखूजन्य पदार्थविक्रेते, सुगंधित सुपारीविक्रेते यांच्यावर शासन निर्देशाप्रमाणे शाळा, महाविद्यालय, तसेच सरकारी कार्यालयाच्या शंभर मीटरच्या आत असलेल्या तंबाखूजन्य पदार्थविक्रेते, पानटपरीधारकावर दंडात्मक कारवाई केली.

यात धुळे शहरातील एकूण ९९ पानटपरी तथा विक्रेतेधारकांवर प्रत्येकी २०० रुपये, याप्रमाणे एकूण १९ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिनय गोयल, धुळे मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर, आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. महापालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, तंबाखू नियंत्रण पथकप्रमुख लक्ष्मण पाटील, सर्व स्वच्छता निरीक्षक, मुकादम यांच्या पथकांनी ही कारवाई केली.

विक्रेत्यांना आवाहन

या वेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळा, महाविद्यालय व सरकारी कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरातील सर्व विक्रेत्यांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले.

स्वच्छता निरीक्षकांना इशारा

तंबाखूजन्य पदार्थ, सुगंधित सुपारी विक्रीच्या अनुषंगाने मुख्य स्वच्छता निरीक्षक वसावे यांनी महापालिकेच्या सर्व स्वच्छता निरीक्षकांना कारवाईसाठी नोटीस बजावली आहे. शहराच्या विविध भागासह शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात अशा प्रकारची कारवाई करावी. कारवाई न केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल, असे नोटिशीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT