Vehicle deposited at Shirpur Taluka Police Station. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : फत्तेपूर फॉरेस्टमध्ये बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

Dhule Crime : फत्तेपूर फॉरेस्ट (ता. शिरपूर) येथील शेतात एका बंदिस्त घरात छुप्या पद्धतीने बनावट देशी दारू बनविणारा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उद्ध्वस्त केला.

सकाळ वृत्तसेवा

वकवाड : फत्तेपूर फॉरेस्ट (ता. शिरपूर) येथील शेतात एका बंदिस्त घरात छुप्या पद्धतीने बनावट देशी दारू बनविणारा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उद्ध्वस्त केला. कारवाईत पथकाने आठ लाख ६० हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. बनावट देशी विदेशी दारूचा कारखान्यावर पंधरा दिवसातून दुसरी कारवाई पथकाने केली. ( Action of Local Crime Investigation Branch destroyed fake country liquor factory in Fatehpur Forest)

फत्तेपूर फॉरेस्ट येथील परिसरातील एका शेतातील घरात देशी दारू निर्मितीचा कारखाना चालविला जात असून परिसरात विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. त्याअनुषंगाने पवार यांनी पथकासह गुरुवारी (ता. ३) रात्री सापळा लावत संशयित मोमल्या पावरा याच्या शेतातील घरावर छापा टाकला. पोलिस आल्याचे कळताच घरातून चार ते पाच व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

यावेळी पोलिसांनी घरातून ४२ हजार रुपये किमतीचे देशी दारुचे १२ खोके, ४० हजार रुपये किमतीचे मशिन, एका प्लास्टिक ड्रममध्ये २०० लिटर सात हजार ५०० रुपये किमतीचे स्पिरीट, दोन हजार रुपये किमतीचे दोन वेगवेगळे ड्रममध्ये रसायन, एक हजार २०० रुपये किमतीचे दोन वेगवेगळे रिकामे ड्रम, नऊ हजार रुपये किमतीचे तीन हजार बूच, चार हजार रुपये किमतीचे लेबल, दोन हजार ५०० रुपये किमतीचे ५० खोके, २६ हजार ८४० रुपये किमतीच्या रिकाम्या बाटल्या, सात लाख रुपये किमतीचे महिंद्रा बोलेरो वाहन (एमएच-०६,बीजी- ३६५१) असा एकूण आठ लाख ५६ हजार ९३८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संशयित मोमल्या पावरा, (रा.फत्तेपुर फॉरेस्ट ता. शिरपूर), संदेश पावरा (रा. मोहिदा ता. शिरपूर) व त्यांचे चिर, पाच साथीदार यांच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकृष्ण पारधी, आरिफ पठाण, महेंद्र सपकाळ, विनायक खैरनार यांनी कारवाईत सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT