Municipal team sealing cement godown of defaulter. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : थकबाकीदाराचे सिमेंट गोडाउन सील; बाळापूर येथे धुळे महापालिका पथकाची कारवाई

Dhule : मालमत्ता कर थकबाकी न भरल्याने धुळे महापालिकेच्या पथकाने बाळापूर येथील सिमेंट गोडाउन सील केले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : मालमत्ता कर थकबाकी न भरल्याने धुळे महापालिकेच्या पथकाने बाळापूर येथील सिमेंट गोडाउन सील केले. थकबाकीदारांनी आपल्याकडील थकबाकी अदा करावी व कटू कारवाई टाळावी, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मालमत्ता कर थकबाकीप्रश्‍नी महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बड्या थकबाकीदारांवर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. (Action of Municipal Corporation team to seal cement godown of defaulters in Balapur )

त्यानुसार जप्ती पथक नेमण्यात आले. वसुली अधीक्षक शिरीष जाधव यांची जप्तीपथक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. या पथकाकडून थकबाकीदारांवर कारवाई सुरू करण्यात आली. बाळापूर येथील शांतिलाल सांड यांच्याकडे पाच लाखांवर थकबाकी आहे. नोटिसा बजावूनही त्यांनी थकबाकी न भरल्याने पथकाने त्यांचे बाळापूर येथील सिमेंट गोडाउन सील केले. (latest marathi news)

मनपा आयुक्त श्रीमती दगडे-पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली अधीक्षक तथा जप्तीपथक प्रमुख जाधव, निरीक्षक किशोर बागूल, निरीक्षक अनिल सुडके, राजेंद्र गवळी, गजानन वाघ, अशोक मंगीडकर या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, मालमत्ता कर थकबाकीदारांनी लवकरात लवकर आपल्याकडील थकबाकी भरावी अन्यथा संबंधितांची मालमत्ता सील करण्यात येईल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Voting: पिपाणीने पुन्हा केला तुतारीचा गेम! वळसे पाटील थोडक्यात वाचले; पवारांच्या ९ बड्या नेत्यांना कसा बसला फटका?

Mobile Charging Tips : कितीही वेळ मोबाईल वापरा चार्जिंग संपणारच नाही, सोपी ट्रिक बघाच

Devendra Fadanvis: ‘महाराष्ट्र नायक’ फडणवीसांनाच मुख्यमंत्री करा, भाजपची जोरदार Lobbying

Utpanna Ekadashi 2024: 26 कि 27 नोव्हेंबर कधी साजरी केली जाणार उत्पन्न एकादशी? जाणून घ्या काय करावे अन् काय नाही

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

SCROLL FOR NEXT