Superintendent of Police Shrikant Dhiware, police officers, staff after arresting the suspects along with the material. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : पिंपळनेरला एक कोटीचा गांजा जप्त; ग्रामीण पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Dhule Crime : देशशिरवाडे (ता. साक्री) शिवारात असलेल्या एका शेतात पोलिसांनी छापा मारत एक कोटी १९ लाख ९२० रुपयाचा गांजा जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

पिंपळनेर : देशशिरवाडे (ता. साक्री) शिवारात असलेल्या एका शेतात पोलिसांनी छापा मारत एक कोटी १९ लाख ९२० रुपयाचा गांजा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळनेर पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. देशशिरवाडे येथे संशयित मोहन देवचंद साबळे हा गांजा सदृश अमली पदार्थ बाळगून वाहनातून त्याची वाहतूक करणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली होती. यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंपळनेर पोलिस ठाणे अधिकारी व कर्मचारी यांनी शुक्रवारी (ता.४) रात्री संशयित साबळे यांच्या शेतावर अचानक छापा टाकला. (Action of rural police local crime branch seized one crore ganja from Pimpalner )

यावेळी पोलिसांना घराजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीसह त्यावर काळे प्लॅस्टिकचे कापड बांधलेले दिसले. याबाबत पोलिसांना संशय आला. पोलिसांनी ट्रॉलीची तपासणी केली असता त्यांना १८ प्लॅस्टिकचे गोण्यांमध्ये खाकी रंगाचे प्लॅस्टिक रॅपर लावलेल्या पाकीटांमध्ये गांजा सदृश अमली पदार्थ मिळून आला. याचे वजन केला असता तो ५४२ किलो भरला. यावेळी पोलिसांनी येथून पोपट ओंकार बागूल, (वय ४०, रा. रायकोट) यास ताब्यात घेत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने शेत व खालील नमुद गांजा सदृश मुद्देमाल हे संशयित आरोपी मोहन देवचंद साबळे यांचे मालकीचे असल्याबाबत सांगितले.

यावेळी पोलिसांनी एक कोटी १९ लाख २३ हजार ९२० रुपयाचा गांजा, सहा लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर (ट्रॉलीसह) ताब्यात घेतला. त्यानंतर पिंपळनेर पोलिस ठाण्यात संशयित बागूल आणि साबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

पोलिस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक धुळे किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक निरीक्षक किरण बर्गे, उपनिरीक्षक प्रकाश पाटील, हवालदार संदीप पाटील, कांतिलाल अहिरे, प्रशांत चौधरी, सदेसिंग चव्हाण, शिपाई अतुल निकम, कमलेश सूर्यवंशी, राजीव गिते, दीपक पाटील, भरत बागूल, संदीप पावरा, सोमनाथ पाटील, दिनेश माळी यांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT