Police team present with two-wheeler thieves. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : अट्टल गुन्हेगाराकडून 4 दुचाकी हस्तगत; एलसीबीची कारवाई

Dhule Crime : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई- आग्रा महामार्गावरील पुरमेपाडा शिवारात एका अट्टल गुन्हेगाराला जेरबंद केले.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मुंबई- आग्रा महामार्गावरील पुरमेपाडा (ता. धुळे) शिवारात मंगळवारी (ता. २४) एका अट्टल गुन्हेगाराला जेरबंद केले. त्याच्याकडून सव्वा लाखाच्या चार दुचाकी हस्तगत केल्या. यातील तपासात छावणी (जि. नाशिक) व चाळीसगाव ग्रामीण (जि. जळगाव) पोलिस ठाण्यातील दोन गुन्ह्यांची उकल झाली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना निर्देश दिले. ( Action taken by lcb to seize 4 two wheelers from persistent criminal)

त्यानुसार मंगळवारी (ता. २४) प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील पुरमेपाडा शिवार येथे एका दुचाकीसह संशयिताला ताब्यात घेतले. दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता, संशयित शाहरुख रशिद शाह (वय २९, रा. प्लॉट क्रमांक १९, गल्ली क्रमांक तीन, इस्लामपुरा, मालेगाव, जि. नाशिक) याने मालेगाव व अन्य ठिकाणांहून दुचाकीची चोरी करून पुरमेपाडा शिवारात लपवून ठेवल्याची कबुली देत चार दुचाकी काढून दिल्या.

बनावट क्रमांक

दुचाकींची खातरजमा केल्यावर दोन दुचाकींचे क्रमांक बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यात एक दुचाकी (अस्सल क्रमांक एमएच ४१, एडब्ल्यू २८६६) छावणी (जि. नाशिक), तर दुसरी दुचाकी (अस्सल क्रमांक एमएच १९ बीके ०१६८) चाळीसगाव ग्रामीण (जि. जळगाव) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचे उघड झाले. संशयित शाह याने चोरीच्या आणखी दोन दुचाकी (एमएच ४१, एएल ०१७१ व एमएच ०३, वाय ४८७२) काढून दिल्या. पथकाने एकूण एक लाख २५ हजारांच्या चार दुचाकी जप्त केल्या.

सराईत गुन्हेगार

संशयित शाह याच्यावर यापूर्वी मालेगाव तालुका व पवार वाडी (मालेगाव) पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, प्रकाश पाटील, दिनेश परदेशी, सचिन गोमसाळे, विवेक वाघमोडे यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT