Commissioner and Administrator Amita Dagde-Patil along with other officers, heads of departments attended the municipal standing committee administrative meeting. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : आचारसंहितेनंतर पहिल्याच स्थायीत कोट्यवधींची कामे मंजूर, 75 लाखांवर कार्योत्तर खर्चही मान्य

Dhule News : आचारसंहितेच्या काळात आवश्‍यक कामांवर झालेल्या कार्योत्तर खर्चासह सुमारे १६ ते १७ कोटी रुपयांच्या कामांना सभेत मंजुरी देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मनपा प्रशासनाने शेकडो कोटींची कामे मंजूर केली. लोकसभेसह नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेली सुमारे चार महिने कामांच्या मंजुरीला ब्रेक लागला होता. मात्र, आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर गुरुवारी (ता. ११) झालेल्या महापालिकेच्या प्रशासकीय स्थायी समिती सभेत कामे मंजुरीचा धडाका प्रशासनाने कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले. आचारसंहितेच्या काळात आवश्‍यक कामांवर झालेल्या कार्योत्तर खर्चासह सुमारे १६ ते १७ कोटी रुपयांच्या कामांना सभेत मंजुरी देण्यात आली. (Dhule After code of conduct crores of works approved in first standing)

महापालिकेच्या स्थायी समितीची प्रशासकीय सभा गुरुवारी (ता.११) सकाळी अकराला महापालिकेच्या स्व. दिलीप पायगुडे सभागृहात झाली. आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, नगरसचिव मनोज वाघ, उपायुक्त डॉ. संगिता नांदूरकर, उपायुक्त हेमंत निकम, उपायुक्त शोभा बाविस्कर, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्यासह विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. सभेत प्रारंभी कार्योत्तर खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आली. साधारण ७५ लाख ६७ हजारांवर खर्चाच्या विविध कामांचा यात समावेश आहे.

१६ कोटींवर खर्चाची कामे

स्थायी समितीपुढे विविध कामे मंजुरीसाठी होती. यात काँक्रीट गटार, रस्ता डांबरीकरण,जलवाहिनी, शेड उभारणी, स्ट्रीट लाइट, पोल, हायमास्ट, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण रोखण्यासाठी संरक्षक भिंत बांधणे, रुग्णवाहिका खरेदी, मलेरिया विभागासाठी अळीनाशक/कीटकनाशक खरेदी, महापालिकेच्या १७ दवाखान्यांसाठी औषधे खरेदी, जमीन वापर नकाशा तयार करणे व रस्त्यांचे जमीन योजना प्रमाणीकृत करण्यासाठी सल्लागार सेवा पुरविणे, नवीन जलकुंभ बांधणे, अमरधाम विकासित करणे आदी विविध कामांचा यात समावेश आहे.

संभाजी महाराज स्मारक

छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास संरक्षण भिंत बांधणे व सुशोभीकरण करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. ३८ लाख ८५ हजार ७६७ रुपये खर्चाचे हे काम कुणाल जयकर पवार यांना अंदाजपत्रकीय दराने देण्यास मान्यता देण्यात आली.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्तीसुधार योजना सन-२०२३-२४ अंतर्गत प्रभाग-१ मध्ये सोलर हायमास्ट बसविण्यासाठी ४९ लाख ४४ हजार रुपये खर्चाचा विषयही मंजूर करण्यात आला. या खर्चातून १७ हायमास्ट बसविण्यात येणार आहेत.

मूलभूत सोयी-सुविधा विकास कार्यक्रम सन-२०२३-२४ अंतर्गत धुळे महापालिकेच्या जुन्या हेरिटेज इमारत डिजीटायझेशन व फर्निचर कामासाठी ९६ लाख ९३ हजार ५७६ रुपये खर्चाच्या सर्वांत कमी दराची आशिष एम. पटवारी यांची निविदा मंजूर करण्यात आली. (latest marathi news)

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरातील अशोक नगर येथे नवीन जलकुंभ बांधण्याचा मार्गही मोकळा झाला. या कामासाठी एक कोटी ३१ लाख ६४ हजार ९७८ रुपये खर्चास तांत्रिक मंजुरी होती. निविदा प्रक्रियेअंती सौरभ संजय कदमबांडे यांची सर्वांत कमी अंदाजपत्रकीय दराने निविदा यासाठी प्राप्त झाली. त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली.

हद्दवाढ जमीन नकाशा

मनपा हद्दवाढ क्षेत्राचा जीआयएस बेस्ड जमीन वापर नकाशा तयार करणे व रस्त्यांचे जमीन योजना प्रमाणीकृत करण्यासाठी सल्लागार सेवा पुरविण्याकामी निविदा दर मागविण्यात आल्या होत्या. यात चारपैकी तीन निविदा पात्र ठरल्या, त्यातील सर्वांत कमी सहा कोटी एक लाख १० हजार १३८ रुपये खर्चाची आरोटे योगेश डी. यांची निविदा होती. वाटाघाटीअंती त्यांनी ४.९२ कोटी (अधिक १८ टक्के जीएसटी) रुपयांत हे काम करण्यास सहमती दर्शविल्याने हा विषय मंजूर करण्यात आला.

अमृत-२ चा विषय राज्य समितीकडे

अमृत-२ अंतर्गत ७१४.५१ कोटी रुपये खर्चाच्या मलनिस्सारण योजनेस शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी प्राप्त निविदांपैकी सर्वांत कमी लार्सन ॲण्ड टुर्बो लि. कंपनीची शे. ८.४३० टक्के कमी दराची निविदा पात्र ठरल्यानंतर राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे ती मंजुरीसाठी पाठविण्यात आली.

मात्र, आचारसंहितेमुळे मंजुरीची पुढील प्रक्रिया होऊ शकली नाही. शासन निर्णयानुसार निविदा मंजुरीची कार्यवाही ७४ दिवसात होणे आवश्‍यक आहे. मात्र, या प्रकरणात १८८ दिवस उलटले आहेत. त्यामुळे फेरनिविदा काढावी किंवा कसे या निर्णयासाठी हा विषय राज्य समितीकडे पाठविण्यास स्थायीने मंजुरी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT