Reduced water storage in Akkalpada project. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : मनपाने आरक्षणापेक्षा जास्त पाणी उचलल्याचा आरोप; लाभार्थी शेतकरी स्ववर्गणीतून मागणार न्यायालयात दाद

सुरज खलाणे

Dhule News : अक्कलपाडा (ता. साक्री) येथील धरणातील नेर, तसेच पांझरा नदीकाठावरील शेतकऱ्यांचे आरक्षित पाणी मिळावे यासाठी नेर व परिसरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. होऊन गेलेल्या रब्बी हंगामात येथील शेतकऱ्यांनी पिकांना लागणाऱ्या एकूण तीन पाण्यांसाठी पाटबंधारे सिंचन विभाग यांच्याकडे रीतसर पाण्याचा अर्ज तसेच रक्कम भरणा केली आहे. यात पाटबंधारे विभागातर्फे एकूण तीन पाणी शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. (Dhule Allegation that municipality has taken more water than reservation )

यापैकी दोन आवर्तने पिकांना देण्यात आली; परंतु धुळे महापालिकेसाठी अक्कलपाडा प्रकल्पातून जलवाहिनी तत्काळ सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांसाठी तिसरे महत्त्वाचे आवर्तन मिळाले नाही. येथील शेतकऱ्यांनी तत्काळ अक्कलपाडा नियोजन समिती निर्माण करून लोकवर्गणी जमा करीत न्यायालयात न्याय मागण्याचा ठामपणे निर्णय घेत निश्चय केला आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

यामुळे दुष्काळ परिस्थितीत शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास मात्र हिरावून गेला आहे. येथील शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांना शेवटचे पाणी मिळावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते; परंतु शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाले नसल्याने नेर तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी याबाबत रोष व्यक्त केला. (latest marathi news)

आजपर्यंत धरणात केवळ १९१.४० दशलक्ष घनमीटर साठा शिल्लक आहे. यातच ५० गावांसाठी ४०० दशलक्ष घनमीटर आवर्तन सोडणे बाकी आहे. धरणातील पाणीसाठा अत्यल्प असल्यामुळे पाणी सोडणे शक्य नाही. यामुळे धुळे शहराला अक्कलपाडा धरणातून पाणी देण्यास मोठा विरोध होत आहे. यातच धुळे मनपा हक्काचे पाणी चोरत असल्याचा आरोप ग्रामस्थ तसेच शेतकरी करीत आहेत. अक्कलपाडा धरणाचा पाणीसाठा ३१३६.८२ दशलक्ष घनमीटर क्षमतेचा आहे; परंतु धरण ६० टक्के भरण्यात येते.

त्यानुसार धरणात केवळ दोन हजार २६९ दशलक्ष घनमीटर साठा होतो. उर्वरित साठ्यातून धुळे शहर तसेच धुळे शिंदखेडा, अमळनेर तालुक्यातील पांझरा नदीकाठावरील गावांसाठी पाणी आरक्षित आहे. वरील गावांसाठी ५ एप्रिलला २५० दशलक्ष घनमीटरचे पहिले आवर्तन सुटले आहे. यामुळे आरक्षणानुसार त्यांना ४००.५३८ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता आहे; परंतु अद्याप १९१.४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

२०० दलघमीच घेतले पाणी ः मनपा

अक्कलपाडा धरणावर महापालिकेची पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे. अक्कलपाडा पाणीयोजनेतून डिसेंबर २०२३ अखेरपासून शहरात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. अक्कलपाडा धरणातून रोज १.४ एमसीएफटी पाणीपुरवठा शहरात होतो आहे. त्यानुसार आतापर्यंत २०० एमसीएफटी पाणी अक्कलपाडा धरणातून घेतल्याची माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT