Anandacha Shidha esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Code of Conduct: धुळे जिल्ह्यात रेशन दुकानातून ‘आनंदाचा शिधा बाद’! आचारसंहितेचा अडीच महिने फटका

Dhule News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने रेशन दुकानातून मिळणारा आनंदाचा शिधा देणे बंद झाले आहे

सकाळ वृत्तसेवा

धुळे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने रेशन दुकानातून मिळणारा आनंदाचा शिधा देणे बंद झाले आहे. आता जूनच्या मध्यापर्यंत अडीच महिने आनंदाचा शिधा मिळणार नसल्याने जिल्ह्यातील अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंबातील सुमारे दोन लाख ९२ हजार ७१० शिधापत्रिकाधारकांच्या आनंदावर विरजण पडल्याचे चित्र आहे.

गरिबांना आनंदाच्या शिधा शंभर रुपयांत सहा वस्तू मिळत होत्या. महागाईच्या जमान्यात हातावर पोट असलेल्यांना ही आनंदाची बाब होती. आता आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधा मिळणार नाही. सध्या अंत्योदय व प्राधान्य कुटुंब असलेल्यांनाच केवळ गहू, तांदूळ चार महिने मिळणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर आनंदाचा शिधा सुरू होईल, असे रेशन दुकानदारांनी सांगितले. (Dhule Anandacha Shidha shop from ration in Dhule district Code of conduct hit two half months marathi news)

असा असतो शिधा

दिवाळीच्या धर्तीवर वितरित केल्या जाणाऱ्या आनंदाच्या शिधा किटमध्ये प्रत्येकी एक किलो साखर व पामतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो हरभराडाळ, रवा, मैदा व पोह्यांचा समावेश होता. राज्य शासनातर्फे सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंबातील दोन लाख ९२ हजार ७१० शिधापत्रिकाधारकांना सण-उत्सव काळात एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या प्रमाणात रवा, हरभराडाळ, मैदा व पोहे असे सहा शिधा जिन्नस संच अर्थात आनंदाचा शिधा दिला जातो.

या स्थितीमुळे विरजण

आचारसंहितेमुळे २४ मार्चला होळी, २८ मार्चला तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती, ९ एप्रिलला गुढीपाडवा, ११ एप्रिलला रमजान-ईद, १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १७ एप्रिलला श्रीराम जयंती, १० मेस अक्षयतृतीया, २३ मेस बुद्धपौर्णिमा या सणोत्सव काळात गरीब शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधाला मुकावे लागणार आहे. (latest marathi news)

जिल्ह्यातील लाभार्थिसंख्या

अंत्योदय अन्न योजनेत धुळे तालुका २५ हजार ४६३, साक्री २० हजार ५५१, शिरपूर १३ हजार ४२१ व शिंदखेडा तालुक्यात १३ हजार ७६६ कुटुंबांची संख्या आहे. जिल्ह्यात एकत्रित कार्डधारकांची संख्या तीन लाख दोन हजार ४७२ इतकी आहे. जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक दोन लाख ९२ हजार ७१० एवढे आहेत.

त्यात अंत्योदय अन्न योजनेंतर्गत जिल्ह्यात ७३ हजार २०१ संख्या आहे. प्राधान्य कुटुंबांत सर्वाधिक दोन लाख २९ हजार २७८ पात्रताधारक आहेत. असे एकूण दोन लाख ९२ हजार ७१० लाभार्थ्यांना सणासुदीत आनंदाचा शिधा दिला जातो. धुळे तालुक्यात ९१ हजार ८४९, साक्री ४८ हजार ९२३, शिरपूर ४५ हजार २८०, तर शिंदखेडा तालुक्यात ४३ हजार २३४ प्राधान्य कुटुंबे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT