RTE admission sakal
उत्तर महाराष्ट्र

RTE Admission : आरटीईअंतर्गत 832 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित; धुळे- नंदुरबारची स्थिती

RTE Admission : धुळे जिल्ह्यात १०५ शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश निश्चित झाला.

सकाळ वृत्तसेवा

RTE Admission : जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशप्रक्रियेच्या मुदतीच्या शेवटच्या दिवसाअखेर गुरुवारी (ता. १) दुपारपर्यंत धुळे जिल्ह्यातील एकूण ६६१, तर नंदुरबार जिल्ह्यातील १७१, असे एकूण ८३२ विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली. दरम्यान, राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला पाच ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे. (dhule and nandurbar Admission of 832 students confirmed under RTE )

धुळे जिल्ह्यात १०५ शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश निश्चित झाला. त्यानुसार एक हजार १३७ जागा आरक्षित आहेत. यासाठी जिल्ह्यातून एकूण दोन हजार ८४९ अर्ज दाखल झाले. त्यातील एक हजार १०२ विद्यार्थ्यांना प्रवेश घोषित झाला आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यात ५४ शाळांत ४१९ जागा राखीव आहेत. त्यासाठी जिल्ह्यातून ८८० अर्ज दाखल झाले. त्यातील २९८ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

धुळे जिल्ह्यात आरक्षित एक हजार १३७ जागांपैकी एक हजार १०२ विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर झाली आहे. त्यातून आतापर्यंत केवळ ६६१ विद्यार्थ्यांनी मुदतीत प्रवेश निश्चित केल्याने ४४१ जागांवरील प्रवेश बाकी आहे. नंदुरबारमध्ये निवड यादीतील २९८ पैकी १७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्यानंतर आणखी १२७ जागांवर प्रवेश शिल्लक आहे.

तथापि, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत पहिली, पूर्वप्राथमिकच्या वर्गातील प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त होणार असल्यास शाळांनी त्याबाबत माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे. संबंधित वाढीव प्रवेश नियमित करण्याच्या सूचना शिक्षण संचालकांतर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. (latest marathi news)

जास्त प्रवेशाबाबत निर्देश

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोणत्याही स्थितीत वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के प्रवेश देणे बंधनकारक आहे. पंचवीस टक्के राखीव जागांवर आधीच प्रवेश दिलेल्या शाळांनीही पहिली, पूर्वप्राथमिकच्या वर्गात वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे. त्यामुळे संबंधित शाळांतील पहिली, पूर्वप्राथमिकच्या वर्गातील प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश होणार असल्यास शाळांनी त्याबाबत माहिती शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालकांना द्यावी. नंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी ते प्रवेश नियमित करून द्यावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुदतवाढीचा लाभ घ्यावा

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला पाच ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेत यंदा धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एकूण १५९ शाळांमधील एक हजार ५५६ रिक्त जागांसाठी एकूण तीन हजार ७२९ अर्ज दाखल झाले. शिक्षण विभागाने काढलेल्या सोडतीतून एक हजार ४०० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. नंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २३ ते ३१ जुलैची मुदत देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT