धुळे : रस्ते, गटारांची कामे करणारे, कन्स्ट्रक्शनवाले कॉन्ट्रॅक्टर आता लँड स्केपिंग, वृक्षारोपणाची कामेही करणार का, असा तिरकस सवाल करत महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे- पाटील यांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षारोपणसाठी प्राप्त निविदेचा विषय रद्द केला. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्राबाहेरचे कामदेखील पदरात पाडून घेण्याच्या प्रकाराला एकप्रकारे चपराक मिळाली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी महापालिकेत पुन्हा एकदा कामे मंजुरीचा धडाका पाहायला मिळाला. (angry question of commissioner is whether roads and sewers will now also plant trees )
मूलभूत सोयी-सुविधा विकास योजनेंतर्गत तब्बल ४० कोटींची कामे मंजूर करण्यात आली. विशेष म्हणजे ही सर्व कामे एकाच कंत्राटदाराला मिळाली आहेत. महापालिकेच्या प्रशासकीय स्थायी समितीची सभा बुधवारी (ता. ९) झाली. आयुक्त तथा प्रशासक दगडे-पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, नगरसचिव मनोज वाघ, उपायुक्त हेमंत निकम, उपायुक्त शोभा बाविस्कर, सहाय्यक आयुक्त प्रांजली मुंडे, विभागप्रमुख उपस्थित होते.
ते दोन्ही विषय रद्द
माझी वसुंधरा ३.० (२०२३-२४) अंतर्गत मनपा हद्दीतील विविध रस्त्यांलगत वृक्षलागवडीसाठी निविदा दराचा विषय सभेपुढे होता. यात २६ लाख ५४ हजार ६३१ रुपये खर्चातून होणाऱ्या कामासाठी एकवीरा कन्स्ट्रक्शनची अंदाजपत्रकीय व सर्वात कमी दराची निविदा होती. या विषयावर आयुक्त दगडे-पाटील संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. कन्स्ट्रक्शनवाले, रस्ते- गटारी करणारे आता झाडे लावणार का? असे म्हणत त्यांनी हा विषय रद्द केला. याच योजनेंतर्गत मोकळ्या जागांवर वृक्षलागवडीचा विषय होता. या विषयावरही आयुक्तांनी जागा निश्चितीबाबत सूचना केल्या व नव्याने दोन्ही विषयांचा `डीपीआर` तयार करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली. (latest marathi news)
चाळीस कोटींची कामे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना २०२४- २०२५ अंतर्गत चार कोटी ९९ लाख ४५ हजार २२९ रुपये खर्चातून सहा ठिकाणी रस्ते काँक्रिटीकरण करणे, मूलभूत सोयी-सुविधा विकास योजनेंतर्गत १९ कोटी ९९ लाख २४ हजार १४७ रुपये खर्चातून रस्ते, गटार, सभागृह, कंपाउंड वॉल, जॉगिंग ट्रॅक करणे, याच योजनेंतर्गत नऊ कोटी ९९ लाख ९३ हजार ३०२ रुपये खर्चातून इतर १७ कामे तसेच याच योजनेंतर्गत रस्ते, गटार, कंपाउंड वॉल, सुशोभिकरण आदी १२ कामांसाठी चार कोटी ९९ लाख ३९ हजार ४६८ रुपये खर्चाच्या कामांचे विषय स्थायीपुढे होते.
या सर्व एकूण ५७ कामांसाठी स्वतंत्ररित्या प्राप्त सर्वात कमी दराच्या (अंदाजपत्रकीय दर) निविदा मंजूर करण्यात आल्या. ही सर्व कामे ‘हिंद कन्स्ट्रक्शन'ला मिळाली. एकूण ३९ कोटी ९८ लाख दोन हजार १४६ रुपये खर्चाची ही कामे आहेत. याशिवाय जिल्हास्तर नगरोत्थान योजनेंतर्गत प्रभाग-६ मध्ये रस्ता काँक्रिटीकरणाचा विषयही मंजूर झाला. यात ७९ लाख ९९ हजार ३२३ रुपये खर्चाचे हे काम नीलेश प्रकाश जाधव या कंत्राटदाराला मिळाले.
औषधांची ३३ लाखांतून खरेदी
महापालिकेत २०२४- २०२५ या वर्षासाठी १२ ॲलोपॅथी दवाखाने, तीन सुतिकागृह, नागरी आरोग्य केंद्र, कुटुंब कल्याण केंद्रासाठी लागणाऱ्या ॲलोपथी औषध खरेदीचाही विषयही मंजूर करण्यात आला. एकूण ३३ लाख ८० हजार २१३ रुपये खर्चातून एकूण १०७ प्रकारची औषधे चार कंपन्यांकडून खरेदी होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.