Vidhan Sabha Election esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Vidhan Sabha Election 2024 : शिंदखेड्याच्या जागेसाठी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला; विधानसभा निवडणूक

Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परंपरेनुसार धुळे ग्रामीण आणि साक्री मतदारसंघाची जागा काँग्रेसच्या वाटेला आली आहे.

निखिल सूर्यवंशी, धुळे

धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परंपरेनुसार धुळे ग्रामीण आणि साक्री मतदारसंघाची जागा काँग्रेसच्या वाटेला आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसने शिंदखेडा मतदारसंघाच्या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या तीनही मतदारसंघात काँग्रेसला अनुकूल स्थिती असल्याचे प्रदेश नेते सांगत आहेत. शिंदखेडा मतदारसंघाच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) दावा करीत असून, काँग्रेसने मात्र ही जागा पूर्वी आमचीच होती आणि आहे, अशी भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. (Assembly election for seat of Shindkheda has damaged prestige of Congress)

महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, समाजवादी पक्ष व अन्य मित्रपक्षांचा समावेश आहे. आघाडीकडून सध्या राज्यासह जिल्ह्यातील जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. असे असताना उमेदवार निवडीसाठी काँग्रेसचे निरीक्षक जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

जागा वाटपाची स्थिती

या पार्श्वभूमीवर होणाऱ्या घडामोडींमध्ये महाविकास आघाडीत धुळे ग्रामीण आणि साक्री मतदारसंघाची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. साक्री मतदारसंघासाठी काँग्रेसच्या दहा इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. यात प्रामुख्याने माजी खासदार बापू चौरे यांचे पुत्र प्रवीण चौरे आणि माजी आमदार डी. एस. अहिरे यांचे पुत्र धीरज अहिरे यांच्यात उमेदवारीसाठी रंगतदार स्पर्धा आहे. पक्षाचा कल प्रवीण चौरे यांच्या उमेदवारीकडे असल्याचे स्थानिक पदाधिकारी सांगतात.

शिंदखेड्यासाठी रस्सीखेच

शिंदखेडा मतदारसंघाच्या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरदचंद्र पवार) कमालीची रस्सीखेच सुरू आहे. या जागेसाठी काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या मतदारसंघातील जागा पूर्वी काँग्रेसचीच होती आणि आहे, असा युक्तिवाद आघाडीच्या बैठकीत मांडत काँग्रेस नेत्यांनी जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर यांच्या उमेदवारीसाठी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. यापूर्वी तीन वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सोडण्यात आली. परंतु, या पक्षाला निवडणुकीत अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला निवडणूक लढवू द्यावी, असा आग्रह प्रदेश नेत्यांनीही धरला आहे.(latest marathi news)

राष्ट्रवादीची भूमिका

शिंदखेडा मतदारसंघाच्या जागेबाबत राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच काय तो निर्णय घेतील. या मतदारसंघातील प्रतिस्पर्धी भाजपचे माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांचे कट्टर समर्थक कामराज निकम यांनी रावल आणि भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरदचंद्र पवार) प्रवेश केला आहे. त्यांच्यासह या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांनी राष्ट्रावादीकडून उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे.

या मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सभा, शेतकरी मेळावेदेखील झाले आहेत. राष्ट्रवादीला या मतदारसंघात जागा मिळावी, यासाठी इच्छुकांकडून हा खटाटोप करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदखेडा मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळते की राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार) याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

गावोगावी भेटीगाठी अन्‌ संवाद यात्रा

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कामराज निकम यांनी साथ सोडल्यानंतर आमदार जयकुमार रावल यांनी शिंदखेडा मतदारसंघ पुन्हा एकदा ढवळून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी मतदारसंघात नुकतीच शेतकरी शिव संवाद विकास यात्रा पूर्ण केली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर यांनी मतदारसंघात परिवर्तन यात्रा सुरू केली आहे, तर राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांनी गावोगावी दौऱ्यातून समस्या जाणून घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच शिंदखेडा मतदारसंघ सर्वाधिक रंगतदार चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय

Porsche Car Accident : डॉ. तावरेसह हाळनोरविरुद्ध फौजदारी खटला चालणार; राज्य सरकारकडून मंजुरी

South West Nagpur Assembly Election : विरोधकांसाठी आमच्या ‘लाडक्या बहिणी’च पुरेशा; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Imtiaz Jaleel: "ज्यानं मला पाडलं, त्याला पाडण्यासाठी मी काय करतो बघाच"; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

IND A vs AFG A : भारतीय संघाचे लोटांगण; अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत वाईट पद्धतीने हरवले

SCROLL FOR NEXT