Abhinav Goyal, Vishal Narwade, Bhushan Patil and Officers were present during the inspection of shortage issue. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Water Scarcity : टंचाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी, सीईओ गोताण्यात; भूजल पातळीत घट

Dhule News : गोताणे (ता. धुळे) येथे जिल्हाधिकारी अभिनय गोयल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी पाणीटंचाईप्रश्‍नी विहिरींची पाहणी केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : गोताणे (ता. धुळे) येथे जिल्हाधिकारी अभिनय गोयल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी पाणीटंचाईप्रश्‍नी विहिरींची पाहणी केली. भूजल पातळीत घट दिसल्याने त्यांनी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची सूचना यंत्रणेला दिली. गोताणे येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीसह परिसरातील शेतीसंबंधी जलस्रोत पातळीत घट झाली असून, गावात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या बनली आहे. (Dhule Water Scarcity)

याअनुषंगाने ग्रामपंचायतीसह सरपंचांनी प्रभावी उपाययोजनांची मागणी जिल्हाधिकारी अभिनय गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्याकडे केली. त्यानुसार ते संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह शुक्रवारी (ता. १९) गोताणे येथे दाखल झाले. त्यांनी विहिरींची पाहणी केली असता भूजल पातळीत घट झाल्याचे दिसून आले.

धरणाचे काम समाधानकारक

ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासह दुधाळ जनावरांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे सर्व त्रस्त आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ प्रभावी उपाययोजनांबाबत कार्यवाहीची सूचना दिली.

तसेच गावातील सुरू असलेल्या मुंजळा, ब्राह्मणदरा, नकटे खोशे या धरणस्थळी भेटीअंती कामाची पाहणी केली. धरणातील काम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. गोताणे येथील धरणे जिल्ह्यात मॉडेल असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. (latest marathi news)

मेपर्यंत काम करावे

निमदरा धरणाचे अपूर्ण राहिलेले काम तत्काळ पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाचे अभियंता, ठेकेदाराला दिली. मेअखेर काम पूर्ण करण्याची सूचना त्यांनी उपस्थितांना दिली.

जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या पाहणीवेळी श्री. गोयल, श्री. नरवाडे यांचे ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आला. सरपंच भूषण पाटील, जलसंधारण विभागाचे अभियंता आर. एस. खोडे, सिंचन विभागाचे पी. जी. पाटील, विशाल घोडे, डी. एस. बाविस्कर, प्रवीण बंजारा.

डी. एम. सिसोदे, महेंद्र गायकवाड, दिग्विजय पाटील, माजी सरपंच महारू पाटील, भगवान पाटील, नितीन पाटील, नाना पाटील, दीपक पाटील, हर्शल पाटील, समाधान पाटील, राजेंद्र पाटील, किसन बागले, ग्रामविस्तार अधिकारी विश्वास बागले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT