Babanrao Gaikwad while guiding the Panzrakan Rescue Committee meeting. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पांझरा-कान साखर कारखाना सुरू करण्यासाठी पुन्हा प्रयत्न

Dhule : पांझरा-कान बचाव-संघर्ष समितीतर्फे बुधवारी (ता. २०) दुपारी साक्री येथील ना. बू. छात्रालयाच्या नानासाहेब जे. यू ठाकरे सभागृहात शेतकरी- कामगारांची संयुक्तपणे बैठक झाली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : पांझरा-कान बचाव-संघर्ष समितीतर्फे बुधवारी (ता. २०) दुपारी साक्री येथील ना. बू. छात्रालयाच्या नानासाहेब जे. यू ठाकरे सभागृहात शेतकरी- कामगारांची संयुक्तपणे बैठक झाली. तीत अवसायनातील पांझरा-कान सहकारी साखर कारखाना तत्काळ सुरू व्हावा यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त झाली. डॉ. तुळशीराम गावित अध्यक्षस्थानी होते. रावळगाव (ता. मालेगाव) कारखान्याचे अध्यक्ष बबनराव गायकवाड उपस्थित होते. प्रा. नरेंद्र तोरवणे यांनी भूमिका मांडली. (Dhule attempt to start Panzara kan sugar factory)

कारखाना बचाव समितीचे निमंत्रक सुभाष काकुस्ते यांनी बैठकीचा उद्देश आणि कामगारांची भूमिका मांडली. एन. एन. पाटील यांनी परिसरातील उसाचे क्षेत्र, शेतकऱ्यांची मानसिकता आणि कारखान्याची परिस्थिती याबाबत मांडणी केली. त्यांनी पांझरा- कान कारखाना सुरू करण्याबाबत डॉ. गावित यांनी शासकीय पातळीवर केलेल्या प्रयत्नांचा ऊहापोह केला.

त्यांच्यासह आमदार मंजुळा गावित हे कारखाना सुरू करण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. श्री. गायकवाड यांना सहकार्याची भूमिका मांडण्यात आली. शशिकांत भदाणे यांनी शेतकरी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. सत्यशोधक चळवळीचे किशोर ढमाले यांनी पांझरा-कान साखर कारखाना सुरू होणे काळाची गरज असून, त्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांचा कल आता ऊसलागवडीकडे वाढत चालला असल्याचे सांगितले.

तसेच कारखाना सुरू झाला तर उसाचा पुरवठा अपुरा पडू देणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भटू आकलाडे, भास्कर काकुस्ते, हृषीकेश मराठे, भाडणेचे सरपंच अजय सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. रावळगाव कारखान्याचे संचालक कुंदन चव्हाण यांनी कारखान्यास भेटीचे उपस्थितांना निमंत्रण दिले. (latest marathi news)

कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक शिवाजी सोनवणे, उत्तम देसले, प्रदीप सोनवणे, गुलाबराव काकुस्ते, गोकुळ परदेशी, नारायण भदाणे, गिरीश नेरकर (कासारे), युवराज काकुस्ते, साहेबराव कुवर, सुभाष देवरे, हिंमतराव देवरे (म्हसदी) उपस्थित होते. अशोक भामरे यांनी आभार मानले.

पाठीशी राहा ः गायकवाड

श्री. गायकवाड म्हणाले, की रावळगाव कारखाना हा परिसरात ऊसटंचाई असतानाही शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करीत चांगला भाव देत आहे. पांझरा-कान कारखाना चालविण्याबाबत सकारात्मक भूमिका आहे. कारखाना भाडेपट्ट्याने नव्हे तर विकत घेऊनच चालविण्याचा खटाटोप आहे. या कारखान्याची मशिनरी कालबाह्य झाली आहे. त्यामुळे नवी मशिनरी बसवून कारखाना चालवावा लागेल. बायप्रॉडक्टचा विचार करावा लागेल. याकामी उपस्थितांनी पाठीशी भक्कम उभे राहावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT