MLA and former revenue minister Balasaheb Thorat speaking at the planning meeting of Bharat Jodo Nyay Yatra. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : खानदेशात भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरणार : बाळासाहेब थोरात

Dhule : धुळ्यात भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त खासदार गांधी यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह खानदेशात ऐतिहासिक होईल असा विश्‍वास व्यक्त करत यात्रेत जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन माजीमंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. धुळ्यात भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त खासदार गांधी यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. १२ मार्चला दोंडाईचा येथे तर १३ मार्चला धुळे शहरात ही यात्रा दाखल होईल. (Dhule Balasaheb Thorat statement Bharat Jodo Yatra in Khandesh will be historic)

भारत जोडो न्याय यात्रेच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी (ता.४) आमदार कुणाल पाटील यांच्या देवपूरमधील संपर्क कार्यालयात बैठक झाली. या वेळी श्री. थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे, जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर, नाशिक काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, ज्येष्ठ नेते राजाराम पानगव्हाणे, माजी खासदार बापू चौरे आदी उपस्थित होते.

श्री. थोरात म्हणाले, की भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून खासदार राहुल गांधी शेतकरी, युवक, महिलांचे प्रश्‍न मांडत आहेत. हुकूमशाही सरकारने राज्यघटनेवर आघात घातला आहे. लोकशाही व राज्यघटना वाचावी म्हणून खासदार गांधी प्रयत्न करीत आहेत. लोकसभेत महाविकास आघाडी ३४ पेक्षा अधिक जागा जिंकणार आहे.

दरम्यान, धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह खानदेशात भारत जोडो न्याय यात्रा ऐतिहासिक होणार आहे. त्यामुळे जनतेने यात्रेत सहभागी होऊन इतिहासाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन श्री. थोरात यांनी केले. या वेळी कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ.अनिल भामरे, राज्य सरचिटणीस युवराज करनकाळ, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल. (latest marathi news)

धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे, साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, बाजार समितीचे संचालक गुलाबराव कोतेकर, साहेबराव खैरनार, कृउबा उपसभापती योगेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, खरेदी-विक्री चेअरमन लहू पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ.दत्ता परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गिरासे यांनी आभार व्यक्त केले.

असे असतील धुळे जिल्ह्यातील कार्यक्रम

आमदार कुणाल पाटील म्हणाले, की खासदार श्री. गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेचे १२ मार्चला सायंकाळी पाचला दोंडाईचा (ता.शिंदखेडा) येथे आगमन होणार असून या यात्रेचा दोंडाईचा येथे मुक्काम असेल. १३ मार्चला ही यात्रा सोनगीर (ता.धुळे) येथे प्रवेश करेल तेथे श्री. गांधी यांचे स्वागत होईल.

सोनगीर, देवभाने-कापडणे चौफुली, नगाव, देवपूरमार्गे सकाळी अकराला यात्रा धुळे शहरात दाखल होईल. महात्मा गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत भारत जोडो न्याय यात्रेची रॅली काढण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सभेलाही खासदार श्री. गांधी संबोधित करतील. दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त १३ मार्चला धुळ्यात खासदार श्री. गांधी यांच्या उपस्थितीत महिला मेळावा होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT