Rahul Gandhi participating in the road show on Agra Road, Students attending Rahul Gandhi's reception in Deopur. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : गांधींचे धुळ्यात जल्लोषात स्वागत

Dhule Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा बुधवारी (ता. १३) सकाळी शहरात दाखल झाली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा बुधवारी (ता. १३) सकाळी शहरात दाखल झाली. दोंडाईचाहून येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना (उबाठा) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आग्रा रोडवरील बॉम्बे लॉज चौकात जंगी स्वागत केले. काँग्रेस कार्यकर्तेही विविध चौकांमध्ये पक्षीय झेंड्यांसह उपस्थित होते. त्यामुळे अवघे शहर काँग्रेसमय झाल्याचे दिसून आले. (Bharat Jodo Nyay Yatra Rahul Gandhi in dhule welcome)

खासदार गांधी सकाळी दहाच्या सुमारास नगावबारीमार्गे शहरात दाखल झाले. येथून जुना आग्रा रोडमार्गे त्यांनी वाहनातून हात उंचावत शहरात प्रवेश केला. आग्रा रोडवर रोड-शो होताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी खासदार गांधी यांचा जयघोष केला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सभेत अर्धा तास संबोधित केले. खासदार गांधी यांच्या भारत जोडो न्याययात्रेनिमित्त पोलिस बंदोबस्त तैनात होता. शिवाय वाहतूक मार्गातही बदल झाला होता.

गांधींवर फुलांचा वर्षाव

धुळे शहरातील एल. एम. सरदार शाळेजवळ शालेय विद्यार्थिनींनी खासदार गांधी यांच्या स्वागतासाठी सकाळपासून गर्दी केली. गांधी यांच्यासमवेत एक सेल्फी काढू, असा त्यांना मोह अनावर झाला; परंतु ताफा दाखल होताच गांधी यांनी वाहनातून न उतरता हात उंचावून स्वागत स्वीकारणे पसंत केले. यात सेल्फीचा मोह अधुराच राहिला. (latest marathi news)

देवपूर भागात दुतर्फा मुस्लिम बांधवानी गांधी यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. काँग्रेसचे नेते इम्तियाज हाजी इस्माईल पठाण, नविद शेख, सलमान मिर्झा, फुरकान शेख, जावेद शाह, इमरान पठाण, अमजद पठाण, आरिफ शाह, शकील शेख, इसहाक मिर्झा, आसिफ मसालेवाले, शारिक शाह, आतिफ सय्यद, शाहीद पठाण, रिजवान शेख आदी उपस्थित होते.

नगावबारीला स्वागत

तत्पूर्वी, गांधी यांचे नगावबारी व दत्तमंदिर परिसरात जल्लोषात स्वागत झाले. कडक सुरक्षा यंत्रणा, बंदोबस्त असतानाही कार्यकर्ते व नागरिकांचा उत्साह दिसत होता. गांधी यांना पाहण्यासाठी गर्दी होती. यात महिला व युवकांचा अधिक समावेश होता. चौकाचौकांत न्याय्य हक्काबाबत पत्रवाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ कॉर्नर सभेत खासदार गांधी यांनी अनेक ज्वलंत प्रश्नांना स्पर्श केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT