Dhule News : शहरात विविध भागात रस्ता काँक्रिटीकरण, संरक्षण भिंत बांधणे, सोलर हायमास्ट बसविणे, तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बांधणे यासह विविध कामांचे भूमिपूजन माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले.
या वेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष रजनी वानखेडे, गटनेते अनिल वानखेडे, भाजप शहराध्यक्ष विनोद पाटील. (Dhule Bhoomi Pujan of four and a half crore development works in Sindkheda was done by former minister and MLA Jaykumar Rawal)
माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख, भिला माळी, प्रकाश देसले, युवराज माळी, मनोहर पाटील, जितेंद्र जाधव, सूरज देसले प्रवीण माळी, प्रकाश चौधरी, चंद्रकांत गोदवाणी, उदय देसले, दादा मराठे यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. शिंदखेडा नगरपंचायतींतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षातील कामे मंजूर अनुदान एकूण चार कोटी ५९ लाख ७४ हजार २३६ रुपये असून, यात महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान नगरोत्थान (जिल्हास्तर).
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना, नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना या योजनेतून शहरातील केदारेश्वर मंदिर, महावीर कॉलनी, जनतानगर, देसलेवाडा, सिद्धार्थनगर, बुराई नदीकाठ, डॉ. बाबासाहेव आंबेडकर पुतळ्याजवळ या भागात रस्ता काँक्रिटीकरण करणे, संरक्षण भिंत बांधणे, सोलर हायमास्ट बसविणे, तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बांधणे यासह विविध कामांचे भूमिपूजन माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले.
यात प्रभाग क्रमांक ११, १०, १२, ८, १५, ६, १४, ३, २, १६, ७ या प्रभागांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक १०, ११, १२ या भागात रस्ते काँक्रिटीकरण करणे यासाठी एक कोटी २३ लाख ९६ हजार १८८, तर प्रभाग क्रमांक ६, ८, १०, १४, १५ या भागात सिमेंट काँक्रिट गटार करणे यासाठी ४९ लाख २५ हजार २५२ रुपये.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बांधण्यासाठी २० लाख २७२ रुपये, सिद्धार्थनगर परिसर सिमेंट काँक्रिट रस्ता बांधणे २४ लाख २५ हजार ५४६ रुपये, बुराई नदीकाठ परिसर १६ लाख ४२ हजार १६३ रुपये, संरक्षण भिंत बांधणे ९३ लाख ६४ हजार ६७५ रुपये प्रभाग क्रमांक दोन व तीन या ठिकाणी सोलर हायमास्ट बसविणे यासाठी ५९ लाख रुपये.
प्रभाग क्रमांक १६ व १४ मध्ये सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता करणे ५५ लाख पाच हजार ७२३ रुपये, प्रभाग क्रमांक ७ मध्ये काँक्रिट रस्ता मजबुतीकरण करणे यासाठी १७ लाख ४० हजार १२७ रुपये अनुदान मंजूर असून, या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.