Mahavitaran esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : दक्षता बाळगत वीज अपघात टाळावे! महावितरणचे आवाहन; धुळे, नंदुरबारसाठी संपर्क क्रमांक जाहीर

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. यात परिसरात ओलसरपणा वाढून किंवा विजेबाबत सुरक्षेची योग्य दक्षता न घेतल्याने वीज अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विजेची साधणे हाताळताना पुरेशी दक्षता घेऊन वीज अपघात टाळावेत, असे आवाहन जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांनी केले. (Dhule careful and avoid electrical accidents Invocation of mahavitaran)

जळगाव परिमंडळात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे. पावसाळ्याच्या दिवसात वादळ-वारा आणि अन्य काही कारणाने वीज यंत्रणेत बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार अधिक प्रमाणात घडत असतात. त्यावर मात करून तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीकडून उपाययोजना म्हणून उपविभागीय स्तरावर वीजयंत्रणा दुरुस्ती पथके कार्यान्वित ठेवलेली आहेत. शिवाय परिमंडळात अपघातविरहित सेवा देण्यासाठी महावितरण कंपनीकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे.

सुरक्षेबाबत आवाहन

नागरिकांनीही वीज सुरक्षेचा भाग म्हणून आपल्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आयएसओ मानांकित वायर आणि उपकरणांचाच अर्थात सुरक्षेच्या दृष्टीने अधिक चांगल्या साधनांचा वापर करावा. घरात किंवा उद्योग-व्यवसायांच्या ठिकाणी अधिकृत वीज ठेकेदारांकडूनच संचमांडणी करुन घ्यावी. (latest marathi news)

घरात किंवा घराच्या छतावर कपडे वाळत घालण्यासाठी लोंखडी तारेऐवजी दोरीचा वापर करण्यात यावा. ती वीज विद्युत तारांपासून सुरक्षित अंतरावर असावी. घरातील जूने किंवा उंदरांनी कुरतडलेले वायर बदलून घ्यावे किंवा तसे तुटलेले वायर इन्सुलेटेड टेपने सुरक्षितपणे टेप करुनच वापरावे.

विजेचे स्विचबोर्ड ओलसर भिंतीवर बसविण्याऐवजी ते भिंतीवर कोरड्या ठिकाणी बसविण्यात यावेत. शेतशिवारात विजेच्या खांबाशेजारील तणावास जनावरे बांधू नयेत. वीज तारांच्या खाली जनावरांचे गोठे, कडब्यांच्या गंजी रचण्यात येवू नयेत. ओल्या हातानी ईलेक्ट्रीक मोटारीच्या स्टार्टरला किंवा विद्युत उपकरणांना स्पर्श करु नये, असे आवाहन श्री. मुलाणी यांनी केले.

तक्रारींसाठी संपर्क क्रमांक जाहीर

विजेसंबंधी ग्राहकांच्या काही तक्रारी असतील तर महावितरण कंपनीच्या संबंधित उपविभागीय कार्यालयात १९१२, तसेच १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा धुळे जिल्ह्यातील ग्राहकांनी ७८७५७ ६६७६३ व नंदुरबार जिल्ह्यातील ग्राहकांनी ७८७५५ ५४५४३ या नियंत्रण कक्षांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य अभियंता मुलाणी यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT