Protest against Zilla Parishad CEO office being locked and punching an employee esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule ZP News : सीईओ दालनास कुलूप ठोकल्याचा अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून निषेध

Dhule ZP News : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या दालनाला कुलूप लावत कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule ZP News : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या दालनाला कुलूप लावत कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणे, शानाभाऊ सोनवणे यांच्यासह चार जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

यांपैकी एका आंदोलकास अटक करण्यात आली असून, पोलिस कोठडी सुनावली आहे. उर्वरित संशयित फरारी असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. (case registered against four persons for punching an employee and locking office of ZP CEO)

दरम्यान, या आंदोलनाचे तीव्र पडसाद जिल्हा प्रशासनात उमटले असून, पंचायत समिती व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (ता. २६) दुपारी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची भेट घेत निवेदन दिले.

या संदर्भात जिल्हा परिषद कर्मचारी अभिषेक गायकवाड यांनी धुळे शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की २३ फेब्रुवारी २०२४ ला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांच्या जिल्हा परिषदेतील दालनाबाहेर नेहमीप्रमाणे ड्यूटीवर असताना जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनीता सोनवणे यांचे पती शानाभाऊ सोनवणे.

कलमाडीचे उपसरपंच विजेंद्र छबिलाल पाटील, रावसाहेब उत्तम ईशी हे काही विद्यार्थी व पालकांसोबत दालनाजवळ आले. साहेब नसल्याचे सांगितल्यावर चौघांनी दालनाला कुलूप लावले, कुलूप लावू नका, असे सांगितले असता त्यांनी मला धक्काबुक्की करून दमदाटी केली. (Latest Marathi News)

तसेच दालनासमोर बसून घोषणा देत आंदोलन सुरू केले. त्याच वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता दालनात जाण्यासाठी आले असता वरील चौघांनी त्यांचा रस्ता अडविला. तसेच त्यांना त्यांचे कर्तव्य करण्यापासून रोखून ठेवले.

आंदोलकांना समजाविण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर साडेबाराला आंदोलकांनी कुलूप उघडले. याबाबत श्री. गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जिल्हा परिषद सदस्या श्रीमती सोनवणे.

शानाभाऊ सोनवणे, विजेंद्र छबिलाल पाटील, रावसाहेब उत्तम ईशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित विजेंद्र छबिलाल पाटील यास अटक करण्यात आली असून, पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित संशयित फरारी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT