Collector Abhinav Goyal esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळ्यात एकखिडकी योजना कक्ष कार्यान्वित; जिल्हाधिकारी गोयल

Dhule : सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एकखिडकी योजना कक्ष (सुविधा) स्थापन झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीत राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना प्रचारविषयक विविध परवानगी प्राप्त करणे सोयीचे व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एकखिडकी योजना कक्ष (सुविधा) स्थापन झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर नोंदणीकृत राजकीय पक्ष व त्यांचे जिल्हास्तरीय पदाधिकारी, उमेदवार वा प्रतिनिधींना धुळे जिल्हा कार्यक्षेत्रात तसेच लोकसभा मतदारसंघासाठी वाहनपरवाना जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी जिल्हास्तरीय एकखिडकी कक्षातून वितरित करतील. तसेच विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात या परवानगीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे एकखिडकी कक्षामार्फत आवश्यक परवाने वितरित करतील.

आवश्यक कागदपत्रे

वाहनपरवाना प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : वाहनधारकांचे संमतिपत्र, प्रतिदिन ठरलेल्या भाड्याच्या रकमेचा तपशील, आरसी बुक, एमव्हीटीची छायांकित प्रत, विमा, फिटनेस सर्टिफिकेट, व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, चालकाचा परवाना, पीयूसी प्रत, वाहनाचा चारही बाजूचा फोटो, वाहन क्रमांकासहित, स्पीकरसाठी संबंधित क्षेत्रातील पोलिस विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्यांना आवश्यक वाटतील अशी अन्य कागदपत्रे. ना-हरकत प्रमाणपत्र परिवहन विभागामार्फत देण्यात येईल.

पक्ष कार्यालय उभारणे

विधानसभा मतदारसंघात तात्पुरते पक्ष कार्यालय उभारण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी परवाने वितरित करतील. यासाठी संबंधित जागामालक यांचे संमतिपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ठरलेल्या भाड्याच्या रकमेचा तपशील, संबंधित क्षेत्रातील पोलिस विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र, सक्षम अधिकाऱ्यांना आवश्यक वाटतील, अशी अन्य कागदपत्रे आवश्यक असून, हे ना-हरकत प्रमाणपत्र पोलिस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत देण्यात येईल. (latest marathi news)

मैदान परवाना

कॉर्नर सभा, प्रचारसभेसाठी मैदान परवाना, लाउडस्पीकर परवान्यांसाठी संबंधित जागामालकाचे संमतिपत्र, उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र.

शिक्षणसंस्थांच्या मालकीची जागा असल्यास संस्थेचे संमतिपत्र, स्वतंत्र प्रवेशमार्ग व बाहेर जाण्याचा मार्ग असे हमीपत्र, संबंधित क्षेत्रातील पोलिस विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र, तसेच सक्षम अधिकाऱ्यांना आवश्यक वाटतील अशी अन्य कागदपत्रे आवश्यक असून, हे ना-हरकत प्रमाणपत्र पोलिस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत देण्यात येतील.

रॅली, मिरवणूक, पदयात्रा

रॅली, मिरवणूक, रोड-शो, पदयात्रा, पथनाट्य, लाउडस्पीकर या परवान्यासाठी अर्ज, रॅली, मिरवणूक, रोड शो, पदयात्रा मार्गाचा आराखडा, परिवहन विभागाचे ना-हरकत पत्र, रॅली, मिरवणूक, रोड शो पदयात्रा मार्गाच्या आराखड्यास पोलिस विभागाची परवानगी.

रॅली, मिरवणूक, रोड शो, पदयात्रामध्ये वाहन वापरावयाचे असल्यास परिवहन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र, स्पीकर वापरावयाचा असल्यास पोलिस विभागाकडील ना-हरकत प्रमाणपत्र, तसेच सक्षम अधिकाऱ्यांना आवश्यक वाटतील अशी अन्य कागदपत्रे आवश्यक असून, हे ना-हरकत प्रमाणपत्र पोलिस विभाग व वाहतूक नियंत्रण विभागामार्फत देण्यात येतील.

विविध परवाने

स्टेज, बॅरिकेड, रोस्ट्रमसाठी संबंधित जागामालकाची संमती, स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व वीज) ना-हरकत प्रमाणपत्र, अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असून, ते पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन विभागामार्फत देण्यात येईल. हेलिपॅड बांधकाम परवाना व हेलिकॉप्टर लँडिग परवाना जिल्हाधिकारी कार्यालयातील गृहशाखा, पोलिस विभाग देईल. शिवाय विविध परवानग्या संबंधित विभाग देतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT