Ladki Bahin Yojana esakal
उत्तर महाराष्ट्र

Ladki Bahin Yojna : गैरसोय टाळण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवा : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

Dhule News : राज्यातील महिला व मुलींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना १ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : राज्यातील महिला व मुलींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना १ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी महिलांचे अर्ज जमा करण्यासाठी महापालिका, पालिका व ग्रामपातळीवर केंद्रांची संख्या वाढवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या.(Ladki Bahin Yojna)

जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी गोयल यांच्या उपस्थितीत बैठक झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, पालिका प्रशासन अधिकारी शिल्पा नाईक यांच्यासह पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी आवश्यक असलेला अर्ज व कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. महिलांची होणारी गर्दी व त्यांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका, पालिका क्षेत्रात वॉर्डनिहाय किमान एक केंद्र स्थापन करावे. (latest marathi news)

जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर केंद्र स्थापन करून योजनेचे अर्ज जमा करून घ्यावेत, तसेच या योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती होण्यासाठी या योजनेची महापालिका, पालिका व जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपातळीवर होर्डिंग्ज, बॅनरच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी.

त्याचबरोबर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र महिलांचे अर्ज भरून घ्यावेत, जमा झालेल्या अर्जांची स्थानिक पातळीवर पडताळणी करून अर्ज तालुकास्तरीय समितीकडे पाठविण्यात यावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी गोयल यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी भाजपकडे भीक मागितली, पण.... अब्दुल सत्तार यांचा खोचक टोला

IND vs AUS 1st Test : विराट कोहलीचे १६ महिन्यांनंतर कसोटीत शतक! भारताचे यजमानांसमोर ५३४ धावांचे तगडे लक्ष्य

Oath Ceremony: महायुतीच्या बैठकांचा धडाका, पुढील रणनिती आखण्यावर चर्चा, शपथविधीबाबत मोठी माहिती समोर!

'अरे.. हसताय काय, टाळ्या काय देताय? माझा माणूस पडला राव..'; कोणाला उद्देशून बोलले अजित पवार?

जमलं रे जमलं ! 'या' महिन्यात तमन्ना आणि विजय वर्मा करणार लग्न ;

SCROLL FOR NEXT