Arboriculture Collector Abhinav Goyal. Neighboring Administrative Officer. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Tree Plantation : वृक्षलागवडीतून मजुरांना रोजगाराची संधी : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

Tree Plantation : जिल्ह्यात पर्यावरणाचा समतोल राखणे, निसर्गाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी पन्नास लाख वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Tree Plantation : जिल्ह्यात पर्यावरणाचा समतोल राखणे, निसर्गाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी पन्नास लाख वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातून वृक्षलागवडीबरोबरच नरेगांतर्गत मजुरांना रोजगाराचीही संधी उपलब्ध होणार असल्याचे मत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी व्यक्त केले. सांजोरी (ता. धुळे) येथे धुळे वन विभागातर्फे ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ व ‘एक पेड मा के नाम’ अभियानांतर्गत वन विभाग व रोहयो विभाग यांच्यातर्फे अभिसरण पद्धतीने २२ हेक्टरवर वृक्षारोपण कार्यक्रम झाला. (Employment opportunities for laborers through tree plantation )

या वेळी जिल्हाधिकारी गोयल मार्गदर्शन करीत होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, धुळे वनवृत्तच्या मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) निनू सोमराज, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, परिवीक्षाधीन प्रशासकीय अधिकारी सर्वानंद डी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीनकुमार मुंडावरे, विभागीय वन अधिकारी (दक्षता) राजेंद्र सदगीर, विभागीय वनाधिकारी (नियोजन) संजय मोरे, तहसीलदार अरुण शेवाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ आदी उपस्थित होते. उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग यांनी प्रास्ताविक केले. कोमल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. वनपरिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ यांनी आभार मानले. (latest marathi news)

पन्नास लाखांचे उद्दिष्ट

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की वृक्षलागवडीसाठी मजुरांना प्रतिदिन पाचशेचा रोजगार मिळणार आहे. या योजनेत ग्रामस्थांना रोजगाराची एक चांगली संधी आहे. रोजगार हमी योजनेच्या जॉबकार्ड धारकांनी वृक्षलागवड कार्यक्रमात सहभाग घेतला तर त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होईल. ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांनीही मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीचा संकल्प सोडून ही मोहीम लोकचळवळ म्हणून राबवावी.

वनमहोत्सवात सहभागी व्हा

मुख्य वनसंरक्षक नीतू सोमराज म्हणाल्या, की १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सव साजरा होत आहे. या कालावधीत जास्तीत जास्त वृक्षलागवड करावी. मोठे वृक्षसवलतीच्या दरात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT