Collector Abhinav Goyal, Water Researcher Bhila Patil, Group Development Officer Ganesh Chaudhary, Umesh Patil etc. while inspecting the deepening of river Bhat. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : नदी संरक्षणाची जबाबदारी स्वीकारल्यास टंचाईतून मुक्ती : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : राजाराम फाउंडेशन व ग्रामस्थांच्या सहभागातून भात नदी खोलीकरणाचे काम खूपच अनुकरणीय आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी नदी खोलीकरण आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षणातून आर्थिक विकास होत असतो. जगातील मोठ्या शहरांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यासाठी नदीचे संरक्षणाची जबाबदारी स्वीकारा म्हणजे प्रत्येक शहर आणि गाव टंचाईतून मुक्त होईल, असे अभ्यासपूर्ण विचार जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी व्यक्त केले. (Dhule Collector Abhinav Goyal statement on river protection for water scarcity)

येथील राजाराम फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून भात नदीवरील मुक्तिधाम बंधाऱ्‍याचे खोलीकरण सुरू आहे. या कामाची पाहणी जिल्हाधिकारी गोयल यांनी केली. या वेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी गणेश चौधरी, विस्ताराधिकारी महंत, प्रा. केतन सूर्यवंशी, जल अभ्यासक भिला पाटील, उपसरपंच हरीश पाटील, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष नवल पाटील, तलाठी वैशाली सोनवणे, प्रवर्तक उमेश पाटील, अध्यक्ष पांडुरंग पाटील, मंडळाधिकारी कल्याणी पाटील, ग्रामविकास अधिकारी मेघा भामरे, संभाजी पाटील, चंद्रकांत पाटील, रोशन पाटील, सिद्धेश पाटील, प्रशांत पाटील, योगेश पाटील, निशान पाटील, बाळू भडगावकर, जयवंत पाटील आदी उपस्थित होते.

भात नदी पुनरुज्जीवनाचे मुख्य प्रवर्तक उमेश पाटील म्हणाले, की मला स्वातंत्र्य सेनानी राजाराम पाटील यांच्याकडून प्रेरणा मिळाली. गावातच पाणी उपलब्ध झाले तर रोजगारासाठी पुणे, मुंबई अथवा इतर मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. भात नदी बारमाही करायची आहे. शिवारातील सारे नालेही प्रवाहित करायचे आहेत. दरम्यान, डी. व्ही. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उमेश पाटील यांनी आभार मानले. (latest marathi news)

या वर्षी पन्नास लाख वृक्षलागवड

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की या वर्षी जिल्ह्यात पन्नास लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट गाठायचे आहे. यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी नियोजन करायचे आहे. वृक्ष हे बिहारी आणि मियावाकी पद्धतीने लावायचे आहेत. दोनशे वृक्ष लावल्यानंतर एका मजुराला रोजगारही उपलब्ध होत असतो. सेंद्रिय शेती करा. यामुळे नदीही विषमुक्त होईल. फळबाग शेती करा. यातून पर्यावरणाचे मोठे संवर्धन होणार आहे. पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रयत्न करा. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करण्याचा प्रयत्न राहील.

मला नदी वाहताना बघायचीय

"मी अजून माझ्या गावाची नदी वाहताना बघितलेली नाही. मला वाहताना बघायचीय म्हणून मी माझ्या पिग्गी बॅंकमधील पैसे नदी पुनरुज्जीवनासाठी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी माझे कौतुक केले. मला बरे वाटले. पण मला खरोखर नदी वाहताना बघायचीय."- स्वरा पाटील, विद्यार्थिनी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT