Amit Shah, Devendra Fadnavis, Dr. Subhash Bhamre, Dada Bhuse. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : मोदी आणि विकास कामांवर फोकस! भाजप- महायुतीचा प्रचार

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Constituency : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात भाजप- महायुतीने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्टार प्रचारकांच्या माध्यमातून निवडणुकीत रंगत आणली आहे. तसेच या मतदारसंघात मतांचे ध्रुवीकरण टळल्याने प्रचारात अधिक कष्ट उपसावे लागलेल्या भाजपच्या उमेदवाराची बहुजन वर्गासह मराठा- पाटील फॅक्टरवर भिस्त आहे. यादृष्टीने रणनीती आखताना प्रचारात नरेंद्र मोदी आणि मतदारसंघातील विकासकामांवर फोकस ठेवला गेला. ( BJP Mahayuti alliance elections through state and national level campaigners )

धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रचार शनिवारी (ता. १८) सायंकाळी पाचला समाप्त होत असून वीस मेस मतदान होणार आहे. दीड ते दोन महिने प्रचारासाठी मिळाल्याने भाजपने निवडणूक जाहीर होताच उमेदवार घोषीत केला. यात विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना सलग तिसऱ्यांदा संधी दिली.

मतदारसंघात मुस्लीम, दलित, आदिवासी समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण करू शकणारी वंचित बहुजन आघाडी, `एमआयएम` पक्ष रिंगणात राहाणार असल्याने मानून भाजपने ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे संकेत दिले. मात्र, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार छाननी प्रक्रियेत बाद आणि `एमआयएम`ने काँग्रेसला पाठिंबा दिल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली.

मदतीला स्टार प्रचारक

या पार्श्वभूमीवर विरोधक काँग्रेसला मुस्लीम, दलित, आदिवासी समाजाची काहीअंशी अधिक मते जाणार असल्याचे चित्र दिसताच भाजपने बहुजन वर्गासह मराठा- पाटील फॅक्टर प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवला. दलित, आदिवासीची समाजाची मते पारड्यात पडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच ओबीसी घटक पाठीशी राहावा म्हणून मंत्री छगन भुजबळ यांचीही भेट भाजप- महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी घेतली. (latest political news)

या जातीय समितीकरणावर भिस्त असताना भाजप- महायुतीचे उमेदवार डॉ. भामरे यांच्यासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्टार प्रचारकही रिंगणात उतरले. यात मतदारसंघात ठिकठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, पक्ष निरीक्षक खासदार डॉ. अजित गोपचिडे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची सभा झाली. मालेगाव येथे शनिवारी (ता. १८) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे.

प्रचारातील विविध मुद्दे

प्रचारात नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणे, मेट्रो रेल्वे व पायाभूत सुविधांचा विकास, त्यांनी काश्‍मिरमधील हटविलेल्या ३७० कलमासह सर्जिकल स्ट्राईक व धार्मिक स्थळांचा हाती घेतलेला विकास, अयोध्देत श्रीराम मंदिर साकारणे, त्यांच्यावर २५ पैशांचाही भ्रष्टाचाराचा आरोप नसणे, देशाच्या सुरक्षिततेला प्राधान्य, आत्मनिर्भर भारत घोषणेत संरक्षण क्षेत्रात स्वयंसिध्दता, चांद्रयान मोहीम, मोफत कोरोना लस मोहीम आदींवर अधिक, तर उमेदवार डॉ. भामरे यांच्या पाठपुराव्यातून होणारी सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजना.

मनमाड- इंदूर रेल्वे मार्गांतर्गत बोरविहीर- नरडाणा रेल्वे मार्ग, धुळ्याहून १८ डब्यांची स्वतंत्र मुंबई रेल्वे सेवा सुरू करणे, धुळे रेल्वे स्थानिक विकास, सहा राज्य व राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती, शहर गावांतर्गत रस्त्यांचे जाळे, पाटचाऱ्या व कालव्यांचे पुनरूज्जीवन, अक्कलपाडा प्रकल्प पूर्ण करणे व धुळ्यासाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना करणे, दहा हजार कोटीहून अधिक विकास निधी मिळविणे, असे मुद्दे प्रचारात रंग भरणारे ठरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT