Contractor's vehicles parked in Sant Shiromani Guru Ravidasji Maharaj Udyan on the bank of Panjra river of Municipal Corporation.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 7 कोटीच्या गार्डनमध्ये ठेकेदाराचे वाहनतळ! शिवसेना UBTने मनपा प्रशासनाचे वेधले लक्ष

Dhule News : देखभाल-दुरुस्तीअभावी गार्डनचे जंगल झाले आहे, असा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तेथे निदर्शने करत मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिकेने शहरातील पांझरा नदी काठावर सात कोटींचे गार्डन तयार केले. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या गार्डनचे उद्घाटन झाले. त्यानंतर आठ दिवस गार्डन नागरिकांसाठी खुले ठेवले. त्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून गार्डन बंद असून गार्डनचा ताबा अद्यापही ठेकेदाराकडे आहे.

एवढेच नव्हे तर संबंधित ठेकेदाराने तेथे वाहनतळ उभारले आहे. शिवाय देखभाल-दुरुस्तीअभावी गार्डनचे जंगल झाले आहे, असा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तेथे निदर्शने करत मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले. (Dhule Contractor parking lot in garden worth 7 crores)

महापालिकेच्या माध्यमातून पांझरा नदी काठी सात कोटी रुपये खर्च करून गार्डन उभारले आहे. या गार्डनला संत शिरोमणी गुरू रविदासजी महाराज यांचे नाव दिले आहे. गेल्या सात महिन्यांपासून हे गार्डन मात्र बंद असल्याचा, गार्डनच्या दोन्ही प्रवेशद्वारांना मोठी कुलुपे लावली आहेत.

गार्डनचा ताबा अद्यापही गार्डनचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे असून हा ठेकेदार त्या ठिकाणी त्याचे बांधकामाचे साहित्य तसेच बुलडोझर, डंपर, आयव्हा, मिक्सर, पोकलेन, ट्रॅक्टर व महानगरपालिकेची इतर वाहने उभी करत आहे, अर्थात तेथे ठेकेदाराने वाहनतळ उभारल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाने केला.

गार्डन नव्हे जंगल

गार्डनमध्ये फुलझाडे व इतर झाडांची निगा न राखल्याने ती जळून गेली आहेत. शोभेच्या झाडांची व्यवस्थित छाटणी न केल्याने तेथे जंगलसदृश स्थिती आहे. तसेच गार्डनमध्ये सर्वत्र साप बिनधास्त फिरताना दिसतात. पाच कोटीच्या गार्डनमध्ये अतिरिक्त दोन कोटी मंजूर करून लेझर शोची व्यवस्था केली. लेझर शोवरील हे दोन कोटी रुपयेही पाण्यात गेले असून, लेझर शो चालविण्यासाठीही महापालिकेला ऑपरेटर मिळू शकलेला नाही, असा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाने केला आहे. (latest marathi news)

भ्रष्टाचाराचे उदाहरण

ही सर्व स्थिती पाहता धुळे महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी भाजप व मनपा प्रशासनाने सात कोटीच्या गार्डनमध्ये वाहनतळ व सर्प उद्यान धुळेकरांसाठी निर्माण केल्याचा, विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे हे मूर्तिमंत उदाहरण असून धुळेकरांनी गार्डनला भेट देऊन आपल्या डोळ्यांनी हा पाहून घ्यावा, असे आवाहनही पक्षाचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी महापौर भगवान करनकाळ, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, भरत मोरे, ललित माळी, देविदास लोणारी, संदीप सूर्यवंशी, गुलाब माळी, नितीन शिरसाट, मच्छिंद्र निकम, विनोद जगताप, सुनील पाटील आनंद जावडेकर आदींनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICSE, ISC Exam Schedule: दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; 'असं' डाऊनलोड करा

IPL 2025 Mega Auction Live Streaming: अर्जुन तेंडुलकर आता मुंबई इंडियन्सला नकोसा झाला, ३० लाखांतही कोणी बोली नाही लावली

Koregaon Bhima News : कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर उद्या अंतिम युक्तिवाद

Porsche Car Accident : आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा अर्ज दाखल

Vaibhav Suryavanshi IPL Auction: नावातच 'वैभव'! १३ व्या वर्षी सूर्यवंशी झाला करोडपती; द्रविडच्या मार्गदर्शनाखाली RR कडून खेळणार

SCROLL FOR NEXT