Superintendent of Police Shrikant Dhiware with the suspects in the Jain temple theft incident in Balsane. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : चोरी, लूटप्रकरणी 5 संशयितांना बेड्या; ‘एलसीबी’ची कारवाई

Dhule Crime : बळसाणे (ता. साक्री) येथील जैन मंदिरातील चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन संशयितांना फागणे (ता. धुळे) येथून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : बळसाणे (ता. साक्री) येथील जैन मंदिरातील चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन संशयितांना फागणे (ता. धुळे) येथून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून दुचाकीसह लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. तिघे संशयित धुळे तालुक्यातील आहेत.

बळसाणे (ता. साक्री) येथे २४ फेब्रुवारीला जैनधर्मीयांच्या विश्वकल्याणक जैन विमलनाथ मंदिरात दानपेटी फोडल्याची घटना घडली. (Dhule crime 5 suspects in case of robbery handcuffed Action of LCB)

याबाबत व्यवस्थापक संजय जयंतीलाल जैन यांच्या फिर्यादीवरून निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मंदिरातील दानपेटीतून ४० हजारांची चिल्लर चोरीस गेली होती. निजामपूर पोलिसांसह ‘एलसीबी’कडून घटनेचा समांतर तपास सुरू होता. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी विशेष मोहीम राबविली.

यात गोपाल ऊर्फ गोलू रतन पाटील (वय १९, रा. बाळापूर, भगवा चौक, ता. धुळे), अमित सुभाष घोडेस्वार (३१, रा. बाळापूर फागणे, बोरसेनगर, ता. धुळे) व समाधान दत्तात्रय पाटील (२३, रा. सुभाषनगर, नवा प्लॉट, दत्तमंदिर चौक, ता. धुळे) यांनी मंदिरात चोरी केल्याची माहिती समोर आली. त्यानुसार ‘एलसीबी’ पथकाने तिघांना फागणे येथून ताब्यात घेतले.

अधिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरलेले ३५ हजार रुपये व याकामी वापरलेली दुचाकी (एमएच १२, एफजी १४७२) असा एकूण एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल काढून दिला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक शिंदे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, सुरेश भालेराव, रविकिरण राठोड, सुशील शेंडे, गुणवंत पाटील, नीलेश पोतदार, हर्शल चौधरी, अमोल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लूटप्रकरणी संशयित जेरबंद

शहरातील देवपूर भागातील नगावबारी चौफुलीवर शुक्रवारी (ता. ८) भरदुपारी देवराम तेरसिंग बारेला (५०, रा. कुलकी, ता. सेंधवा, जि. बडवानी, ह.मु. आधारनगर, वलवाडी, देवपूर, धुळे) यांच्या खिशातील दहा हजारांची रोकड जबरीने लुटून नेली होती. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. लुटीच्या घटनेतील दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांत जेरबंद केले.

संशयितांकडून लुटीतील रोकडही हस्तगत करण्यात आली. संशयित राजेश रमेश पाटील (वय ४३, रा. शनिमंदिरजवळ, फागणे, ता. धुळे) याने त्याच्या साथीदारासह ही लूट केल्याची गुप्त माहिती ‘एलसीबी’ला मिळाली. त्यानुसार ‘एलसीबी’ पथकाने संशयित राजेश पाटील याला फागणे येथून ताब्यात घेत विचारपूस केली.

त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच हा गुन्हा साथीदार गोपाल ऊर्फ गोलू रतन पाटील (१९, रा. भगवान चौक, बाळापूर, ता. धुळे) याच्या मदतीने केल्याचे सांगितले. ‘एलसीबी’ पथकाने दोघा संशयितांकडून नऊ हजार ९५० रुपये रोकड हस्तगत केली. पोलिस निरीक्षक शिंदे, बाळासाहेब सूर्यवंशी, अमरजित मोरे, योगेश राऊत, संजय पाटील, मुकेश वाघ, पंकज खैरमोडे, प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, शशिकांत देवरे, देवेंद्र ठाकूर, हर्शल चौधरी, जितेंद्र वाघ, महेंद्र सपकाळ, जगदीश सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT