Used Maruti Eeco car stolen with burglars. Neighbors Police Inspector Kishore Kumar Pardeshi, Hemant Raut, Police Staff. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : दोंडाईचा येथे जबरी चोरी करणारे चोरटे जेरबंद

Dhule Crime : वनरक्षकाकडून जबरी चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

दोंडाईचा ः वनरक्षकाकडून जबरी चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपये, जबरी चोरी करतेवेळी वापरलेली मारुती इको गाडी जप्त करण्यात आली आहे. अधिकार बापू पदमोर हे तोरणमाळ शहादा दोंडाईचा रस्त्याने हट्टी (ता. साक्री) येथे घरी जात होते. दोंडाईचा- मालपूर रस्त्यावर रात्री अकराच्या सुमारास मोटारसायकल थांबून मारुती गाडीतील चार जणांनी लाकडी दांड्याने त्यांना मारहाण केली. (Burglars jailed for forcible theft in Dondaicha )

पदमोर यांच्या कडील रोख रक्कमेची एक लाख २० हजारांची बॅग बळजबरीने चोरून नेली होती. २६ सप्टेंबरला गुन्हा दाखल झाला होता. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी तांत्रिक बाबींचा आधार घेत छडा लावला. छत्रपती संभाजीनगर येथे आरोपी अभिषेक मोरे (जि. हिंगोली) त्याच्यासोबत असलेले अमिद शेरखान पठाण (संगमनेर), विशाल भगवान कानकाटे (जि. अहमदनगर), ओमकार रामदास कदम (जि. नाशिक) यांनी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिस उपनिरीक्षक हेमंत राऊत, हवालदार हिरालाल सूर्यवंशी, प्रवीण निंबाळे, शुभम चित्ते या पथकाने कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT