Police officers and team present during the interrogation along with the items seized from the robbers. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime: दरोडेखोरांची टोळी मुद्देमालासह अटकेत; धुळे तालुका पोलिस ठाण्याची काही तासांत कामगिरी

Latest Crime News : दरोडेखोरांच्या टोळीला काही तासांत धुळे तालुका पोलिस ठाण्याने मुद्देमालासह गजाआड केले. या दरोडेखोरांकडून लुटीतील सर्व रोकड हस्तगत करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime : फायनान्स कंपनीच्या वसुली व्यवस्थापकाला लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला काही तासांत धुळे तालुका पोलिस ठाण्याने मुद्देमालासह गजाआड केले. या दरोडेखोरांकडून लुटीतील सर्व रोकड हस्तगत करण्यात आली. (Gang of robbers arrested with loot)

अर्थे (ता. शिरपूर) येथील चेतनसिंग मोहनसिंग परदेशी (वय २२) हे भारत फायनान्स कंपनीत कलेक्शन मॅनेजर आहेत. आर्वी, धाडरे (ता. धुळे) येथील बचत गटाच्या सदस्यांना वाटप केलेल्या कर्जाच्या हप्त्याची वसुलीची रक्कम घेत बोरकुंड येथील त्यांचे सहकारी प्रकाश कोळी यांना वसुलीत परदेशी यांनी मदत केली. पावसामुळे रात्री उशिराने म्हणजेच साडेअकराला ते त्यांच्या दुचाकीने धुळ्याकडे निघाले.

बोरकुंडकडून धुळ्याकडे येत असताना रात्री ११.४० ला दोंदवड फाट्याजवळ त्यांची दुचाकी पाच ते सात जणांनी थांबविली. त्यांच्या पोटाला चाकू लावत कर्जवसुलीची ७८ हजारांची रोकड, कार्यालयीन कामकाजाचे ५० हजार किमतीचे दोन टॅब, पंधरा हजार किमतीचे तीन बायोमेट्रिक मशिन हिसकावून दरोडेखोर दुचाकीद्वारे पळाले. ही घटना बुधवारी (ता. २५) घडली. (latest marathi news)

या प्रकरणी परदेशी यांनी तालुका पोलिसांकडे फिर्याद दिली. या गुन्ह्यात तालुक्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तपास चक्रे फिरविली. त्यांच्यासह पोलिस पथकाने दिनेश महादू रामोशी (वय ३३), रवींद्र मोहन भिल (वय २०), राजेंद्र शांताराम भिल (वय २२), नारायण श्रीराम भिल (वय २५), कैलास ताराचंद भिल (वय ३०, सर्व रा. रतनपुरा) यांना ताब्यात घेतले.

त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून रोकडसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक कृष्णा पाटील, हवालदार किशोर खैरनार, नीतेश चव्हाण, अविनाश गहिवर, कुणाल पानपाटील, उमेश पाटील, प्रवीण पाटील, विशाल पाटील, धीरज सांगळे, सखाराम खांडेकर, राहुल देवरे, रवींद्र राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT