Nilesh Nikam, Swapnil Wagh esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : विवाहितेवर सामूहिक बलात्कार; फरारी संशयितांना तासाभरात बेड्या

Crime News : निलेश सतीश निकम (वय ३२) व स्वप्निल शिवाजी वाघ (वय २६) अशी संशयितांची नावे आहेत

सकाळ वृत्तसेवा

पिंपळनेर : येथील बैल मार्केटमध्ये उंभर्टी (पो. नवापूर, ता. नवापूर, जि. नंदुरबार) येथील मजुरीकाम करणाऱ्या ३९ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर फरारी झालेल्या पिंपळनेर (घोड्यामाल) येथील संशयित आरोपींना एक तासात बेड्या ठोकल्या. निलेश सतीश निकम (वय ३२) व स्वप्निल शिवाजी वाघ (वय २६) अशी संशयितांची नावे आहेत. (Dhule Crime Gang rape of married woman)

उंभर्टी येथील पीडितेने पिंपळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी व मुलगा नेहमीप्रमाणे सटाणा येथील कांदा व्यापाऱ्याकडे मजुरीसाठी गेलो होतो. रविवारी (ता.२६) सटाणा येथील काम आटोपून सायंकाळी सहाच्या सुमारास ॲपेरिक्षाने घरी जाण्यासाठी निघालो होतो.

रात्री आठच्या सुमाराम पिंपळनेर बसस्थानकात उतरलो. परंतु, पिंपळनेर तेथून गावी जाण्यासाठी बस नसल्याने मी व मुलाने स्थानकात काहीवेळ प्रतीक्षा करुनही बस न मिळाल्यामुळे सामोडे चौफुली येथे खासगी वाहनाची प्रतीक्षा करीत असताना रात्री अकराच्या पिंपळनेर बसस्थानकाच्या दिशेने पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहनातून आलेल्या दोघांनी मला जबरदस्तीने बैल बाजारातील मैदानावर नेत अत्याचार केला. (latest marathi news)

पीडितेने याबाबत मुलाचा घडला प्रकार सांगितला. एका एटीएमवरील वॉचमनने देखील पिकअप वाहनाची ओळख सांगितली. त्यानंतर पीडितेने पिंपळनेर पोलिस ठाण्यात जाऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. पोलिसांनी पिकअप वाहनाच्या क्रमांकावरून संशयितांचा शोध सुरु केला.

एमएच-१८-बीजी-४६२६ या क्रमांकाचे पिकअप वाहन शोधण्यात पोलिसांना यश आले. संशयित पिंपळनेरच्या घोड्यामाल येथीर रहिवाशी आहेत. संशयित निलेश सतीश निकम (वय ३२) व स्वप्निल शिवाजी वाघ (वय २६) यांना बेड्या ठोकल्या. दरम्यान, संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, पोलिस उपनिरीक्षक भूषण शेवाळे, पोलिस हवालदार कांतीलाल अहिरे, श्याम अहिरे, पोलिस कॉन्स्टेबल नरेंद्र परदेशी यांनी संशयितांचा शोध घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT