Assistant Police Inspector Sachin Kapadnis, police personnel etc. while destroying the liquor and chemicals of hand furnace. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध पिंपळनेर पोलिसांची धडक कारवाई

Dhule Crime : पोलिसांनी आचारसंहिता लागल्यापासून १५ एप्रिलपर्यंत अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत सोळा गुन्हे दाखल.

सकाळ वृत्तसेवा

पिंपळनेर : येथील पोलिसांनी आचारसंहिता लागल्यापासून १५ एप्रिलपर्यंत अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत सोळा गुन्हे दाखल करून आतापर्यंत गावठी हातभट्टीची दारू व कच्चे रसायन पाच हजार ४६८ लिटर व देशी-विदेशी ५२.४२ लिटर मद्य असा एकूण तीन लाख ६० हजार ३६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करून कारवाई केली. (Dhule Crime Pimpalner police crackdown against illegal liquor sellers)

आगामी लोकसभा निवडणूक २०२४ अनुषंगाने विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे व पोलिस अधीक्षकांनी घेतलेल्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने तसेच अपर पोलिस अधीक्षक धुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, धुळे ग्रामीण विभाग, साक्री, यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस यांनी कारवाई केली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यापासून अवैधरीत्या गावठी दारू बनविणारे व विक्री करणारे तसेच विनापरमिट देशी-विदेशी मद्य विकणारे यांच्याविरुद्ध वेळोवेळी गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून पिंपळनेर पोलिस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी तसेच गुजरात सीमेलगतच्या गावांमध्ये हातोडे चालवून दारूबंदी कायद्यान्वये आताप्रयंत १६ गुन्हे दाखल केले.

तसेच गावठी हातभट्टीची दारू व कच्चे रसायन पाच हजार ४६८ लिटर व देशी-विदेशी मद्य ५२.४२ लिटर असा एकूण तीन लाख ६० हजार ३६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट, हस्तगत करून कारवाई केली.

माहिती कळविण्याचे आवाहन

पिंपळनेर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, पोलिस उपनिरीक्षक विजय चौरे, पोलिस उपनिरीक्षक भूषण शेवाळे यांच्यासह पिंपळनेर पोलिस ठाण्यातील स्टाफने कारवाई केली आहे. आपल्या गावातील कोणी अवैध गावठी हातभट्टीची दारू तयार किंवा विक्री करत असेल त्याबाबची माहिती पिंपळनेर पोलिस ठाण्यास कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT