Local crime branch team along with recovered dry hemp, fake liquor stock. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : धुळ्यात कोरडा भांग तस्करांचा पर्दाफाश; एलसीबीची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : जनावरांच्या गोठ्यालगतच्या खोलीतून तब्बल १३ लाख ८० हजार रुपये किमतीचा कोरडा भांग तसेच अन्य एका खोलीतून बनावट दारूचा साठा पकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोरडा भांग तस्करांसह बनावट दारू तयार करून विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश केला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना शनिवारी (ता.१५) गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दीपक ऊर्फ हुल्या कापुरे (रा. वाडीभोकर स्टॉपजवळ, धुळे) हा सुशिनाल्या लगत असलेल्या इंदिरानगर भिलाटीमधील जनावरांच्या गठ्ठयात मोठ्या प्रमाणात गांजा तसेच त्याच्या राहत्या घरासमोरील खोलीत बनावट दारूचा साठा चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. (police exposed those who manufactured and sold fake liquor)

याबाबत खात्री करून कायदेशीर कारवाईचे आदेश त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता इंदिरानगर भिलाटीमधील जनावरांच्या गोठ्यालगतच्या खोलीत वाल्मिक अशोक पाटील (वय ४०, रा. प्रियदर्शनी नगर नगांवबारी, देवपुर धुळे) हा तेथे मिळून आला.

त्याच्या कब्जात खोलीमध्ये एकावर एक अशा प्लॅस्टिकच्या पांढऱ्या गोण्या रचलेल्या दिसून आल्या. या गोण्यांमध्ये हिरव्या रंगाची सुक्या भांगेची भुकटी मिळून आली. एकूण २३० गोण्यांमध्ये प्रती गोणी ३० किलो वजनाप्रमाणे एकूण सहा हजार ९०० किलो भांग आढळला. प्रतीकिलो दोनशे रुपये याप्रमाणे या मालाचा किंमत एकूण १३ लाख ८० हजार रुपये आकारण्यात आली.

बनावट दारूसह साहित्य जप्त

तसेच दीपक ऊर्फ हुल्या कापूरे याच्या राहत्या घरासमोरील खोलीत बनावट दारू तयार करण्याचे साहित्य, रसायन व तयार केलेली बनावट दारू व साहित्य असा एकूण ८९ हजार २५ रुपयांचा मुद्देमालही पथकाला आढळून आला.

दोघांवर गुन्हा

बनावट दारू तयार करून त्याची चोरटी विक्री करणे तसेच लाखो रुपयांचा कोरडा भांग साठवून त्याची तस्करी केल्याप्रकरणी दीपक शंकर कापुरे व वाल्मीक अशोक पाटील यांच्याविरुद्ध पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक श्री. धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे. सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. पवार, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, पोलिस उपनिरीक्षक अमरजित मोरे, पोलिस उपनिरीक्षक अमित माळी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिलीप खोंडे, हेड कॉन्स्टेबल हेमंत बोरसे, मच्छोंद्र पाटील, संदीप पाटील, रवींद्र माळी, योगेश चव्हाण, प्रकाश सोनार, संतोष हिरे, प्रल्हाद वाघ, सुरेश भालेराव, मायुस सोनवणे, योगेश साळवे, निलेश पोतदार, किशोर पाटील, योगेश जगताप, शिला सूर्यवंशी, प्रशांत विजयमाळे, कैलास महाजन, संजय सुरसे या पथकाने ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT