Police raided an unauthorized slaughterhouse and seized  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News: अनधिकृत कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; शिंदखेड्यात 3 हजार रुपये किमतीचे गोवंश सदृश्‍य मांस जप्त

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शहराच्या हद्दीत गस्त घालताना माळी वाड्यालगतच्या रज्जाक नगरामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करून छुपी गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांना छापा टाकून तीन हजार रुपये किमतीचे गोमांस सदृश्य मांस जप्त केले. याबाबत चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यातील एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. अस्लम शेख हैदर शेख असे अटक केलेल्याचे नाव आहे. (Police raid on unauthorized slaughterhouse in Shindkheda )

उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे, पोलिस निरीक्षक दीपक पाटील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. शिंदखेडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक विजय ठाकूर हे सहकारी कुणाल फुलपगारे यांच्यासह शहरात बुधवारी सकाळी गस्त घालत असताना गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती विनोद देसले यांनी पोलिसांना दिली. गस्त पथक तत्काळ रज्जाक नगर येथे दाखल झाले असता परिसरातील रहिवासी अस्लम हैदर शेख त्याच्या साथीदारांसह राहते घराच्या बाजूला पत्री शेडमध्ये मांस कब्जात बाळगून त्याची चोरटी विक्री करीत असल्याचे आढळले.

पोलिस येत असल्याची खबर मिळताच अशफाक हमीद कुरेशी, साजिद हमीद कुरेशी (दोघे रा. कुरेशी वाडा शिंदखेडा), शेख जहांगीर शेख हैदर (रा. रज्जाक नगर) हे तिघे घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी अस्लम यास ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत वरील तिघांच्या मदतीने मांसाची विक्री करत असल्याचे सांगितले.

विनोद देसले, केशव माळी, सुभाष माळी, राजेंद्र मराठे, भुपेंद्रसिंग राजपूत, सुरेंद्र देसले, कुणाल माळी, रवींद्र माळी यांच्या समक्ष पंचनामा केला. जप्त मांस पैकी काही मांस हे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) संकेत पुपलवार यांनी तपासणी करता घेतले. उर्वरित मांस व इतर साहित्य हे पंचांसमक्ष पोलिस स्टेशनला आणले. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT