Squad with confiscated materials of fake brewery. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : बनावट मद्यनिर्मिती कारखान्यावर छापा! भरारी पथकाची कारवाई; सव्वासात लाखांचा मुद्देमाल पकडला

Crime News : याप्रकरणी एका संशयितास अटक केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी (ता. १०) रात्री महालकाळी (नेर, ता. धुळे) शिवारात एका बनावट मद्यनिर्मिती कारखान्यावर छापा टाकून सुमारे सात लाख १३ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एका संशयितास अटक केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. (Dhule Crime Raid on fake brewery Operation of Bharari Squad)

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांना प्राप्त माहितीच्या आधारे भरारी पथकाने महालकाळी शिवारातील रवींद्र चिंतामण धोबी यांच्या शेत गट क्रमांक ७४/२ मधील पत्री शेडमध्ये बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकला.

संशयित सेन अटकेत

बनावट देशी दारू सुगंधी संत्रा २२८ सीलबंद बाटल्या, बनावट देशी दारू मिश्रित ३०० लिटर एक प्लास्टिक ड्रम, बनावट देशी दारू मिश्रित २०० लिटर एक प्लास्टिक ड्रम, एक हजार लिटर क्षमतेचे एक रिकामे प्लास्टिक ड्रम, २५० लिटर क्षमतेचे दोन रिकामे प्लास्टिक ड्रम, देशी दारू, सुगंधी संत्रा लेबल असलेले बनावट ७२० पुठ्ठे,

देशी दारू सुगंधी संत्राचे बनावट दोन हजार ७८० पत्री बुच, बनावट देशी दारू सुगंधी संत्रा बॅच नंबर आरव्ही १९७ जानेवारी २०२४ चे ४० हजार लेबल, १८० मिलि क्षमतेच्या एकूण दहा जार ९२० रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, बुच सीलबंद करण्याचे कॅपिंग मशीन, दोन पाणी मोटार व पाण्याची नळी, एक पाणी शुद्धीकरण आरओ मशीन,

२२ प्लास्टिक ट्रे, एक दारू मिश्रण करणारे हायड्रोमीटर थर्मामीटर मशीन, डिंक सिलिंग टेप, तीन इलेक्ट्रिक बोर्ड वायर, दोन प्लास्टिक नरसाळे, एक मोबाईल, असा एकूण सात लाख १३ हजार २६०रुपयांचा मुद्देमाल आढळला. याप्रकरणी संशयित जोनीकुमार छोटूलाल सेन याला अटक करण्यात आली. (latest marathi news)

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक डी. एल. दिंडकर, डी. पी. नेहुल (शिरपूर), आर. आर. धनवटे (धुळे), दुय्यम निरीक्षक एस. एस. शिंदे, एस. एस. आवटे, पी. बी. अहिरराव, बी. एस. चोथवे, आर. बी. लांजेकर, अभिजित मानकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जितेंद्र फुलपगारे, जवान के. एम. गोसावी, गोरख पाटील, दारासिंग पावरा, विजय नाहिदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT