Mamata Pavara esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : ‘त्या’ प्रेयसीचे शिर धडावेगळे; प्रेमप्रकरणाचा धक्कादायक शेवट

Dhule Crime : लग्न करून मालमत्ता नावावर करण्यासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचे शिर धडावेगळे करून शेवट केल्याची धक्कादायक घटना पोलिस तपासात उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : लग्न करून मालमत्ता नावावर करण्यासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचे शिर धडावेगळे करून शेवट केल्याची धक्कादायक घटना पोलिस तपासात उघडकीस आली. संशयित परप्रांतीय प्रियकरासह बोराडी (ता. शिरपूर) येथील त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. (Dhule Crime shocking incident of ending up with severed head)

७ फेब्रुवारीला पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलिस ठाणे हद्दीतील कारेगाव शिवारात खोडाळा ते कसारा रस्त्यावर वैतरणा नदीवरील पुलाखाली शिर नसलेले महिलेचे धड आढळले होते. मृतदेहाच्या हातावर ‘ममता’ असे नाव गोंदले होते. पायात चांदीचे जोडवे व त्यावर ‘एसडीएस’ असा मार्क होता. या धाग्यावरून पालघर ‘एलसीबी’ने तपासाला सुरवात केली.

‘एसडीएस’ शिरपुरात

एसडीएस मार्कवरून पोलिसांचा तपास सुरू झाला. राज्यातील पोलिस ठाण्यात माहिती पाठविण्यात आली. असा दागिना प्रामुख्याने शिरपूर परिसरात आदिवासी महिला वापरत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस शहरात दाखल झाले. येथील दीक्षा ज्वेलर्सचे संचालक सुधाकर दीपचंद सोनार यांनी दागिना ओळखून त्यांनी तयार केल्याची माहिती दिली. त्यानंतर ममताचा ठावठिकाणा शोधण्याचे काम सुरू झाले.

४४५ ममतांचा तपास

मतदारयादीच्या आधारे पोलिसांनी ममताचा शोध घेतला. पोलिसपाटील संघटनेने समाज माध्यमांतून मोहीम राबविली. शिरपूर तालुक्यात एकूण ४४५ ममता पावरा आढळल्या. पैकी बेपत्ता ममताचा शोध सुरू असताना लाकड्या हनुमान (ता. शिरपूर) येथील ममता पावरा हिचे वर्णन मृतदेहाशी जुळले. तिचे सुनील तथा गोविंद यादव नामक परप्रांतीय व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (latest marathi news)

प्रेयसीचा काटा काढला

पोलिसांनी शिताफीने संशयित सुनील ऊर्फ गोविंद यादव (वय ४५, रा. सोलापूर) याला अटक केली. तो (खेंचा, जि. महाराजगंज, उत्तर प्रदेश) येथील मूळ रहिवासी आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून बोराडी येथील महेश रवींद्र बडगुजर (३१) याला अटक करण्यात आली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

मृत ममताने प्रियकर सुनीलकडे लग्नाचा तगादा लावला. आपल्या नावावर मालमत्ता करावी म्हणून ती मागे लागली होती. तिच्या मागणीला कंटाळून संशयित सुनील यादव याने तिला लोणावळा येथे फिरण्यासाठी नेण्याचे आमिष दाखविले. त्याच्या कटात संशयित महेश बडगुजर यालाही सामील करून घेतले.

शिर कुठेतरी फेकले

दोघांनी तिला घटनास्थळी नेऊन रुमालाने गळा आवळून ठार केले व तिचे शिर धडावेगळे केले. शिर नसल्यामुळे तिच्याविषयी माहिती कुणालाही कळणार नाही असा त्यांचा अंदाज होता. तिचे शिर गाडीत घेऊन ते परतले. त्यांनी शिर कुठे फेकले, त्याचा तपास जव्हार विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणपत पिंगळे करीत आहेत. पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक पंकज शिरसाट, एलसीबीचे निरीक्षक अनिल विभूते व सहकाऱ्यांनी हा तपास केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT