Crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime: उद्योग न उभारताच 21 लाखांवर सबसिडी लाटली! बनावट कागदपत्रांद्वारे शासनाची फसवणूक; संशयिताला पोलिस कोठडी

Crime News : त्याने बनावट कागदपत्रे, शिक्के कोठून तयार केले या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का यासह रकमेबाबत पोलिस चौकशी करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime : महावितरणचे बनावट कोटेशन, भरणा पावती व महापालिका नगररचना विभागाकडून बनावट इमारत मंजुरी आराखड्याच्या आधारे सुमारे २१ लाख ७६ हजारांची सबसिडी घेत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संशयिताला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली. त्याने बनावट कागदपत्रे, शिक्के कोठून तयार केले या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का यासह रकमेबाबत पोलिस चौकशी करीत आहेत. (Dhule defrauding government forged documents Suspect in police custody)

जिल्हा उद्योग केंद्राचे निंबाजी पीतांबर पाटील यांच्या फिर्यादीनुसार ३१ जानेवारी २०२४ ला शकील अहमद अकील अली अन्सारी याच्याविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्याने ३० जून २००६ ते ५ एप्रिल २०१० दरम्यान टेक्सटाइल उद्योगासाठी शासकीय सबसिडी मिळविण्यासाठी ए. पी. आयकॉन टेक्सटाइल नावाने धुळे जिल्हा औद्योगिक केंद्र येथे कंपनी उघडल्याचे दाखविले.

ही कंपनी सर्व्हे क्रमांक ४५४/१, प्लॉट क्रमांक- ६ (मुस्लिमनगर, वडजाई रोड, धुळे) येथे असल्याचे दर्शविले. याकामी इमारत नसताना बनावट बिल्डिंग प्लॅन व महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे बनावट कोटेशन व भरणा पावती आदी बनावट कागदपत्रे जिल्हा उद्योग केंद्रात सादर केली.

सर्व बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनी स्थापन झाल्याचे दर्शवून ए. पी. आयकॉन टेक्सटाइलचे मालक शकील अहमद अकील अली अन्सारी (रा. मुस्लिमनगर, सर्व्हे क्रमांक ४४५/१ वडजाई रोड, धुळे) या संशयिताने २१ लाख ७६ हजार रुपये सबसिडी घेतली. (latest marathi news)

पोलिस कोठडी

या प्रकरणी शकील अन्सारी याला २२ मे २०२४ ला अटक झाली. गुरुवारी (ता. २३) त्याला न्यायमूर्ती पी. पी. सगडे यांच्या न्यायालयासमोर हजर केले. अतिरिक्त पोलिस प्रॉसिक्युटेड के. ए. जगपती यांनी युक्तिवाद केला. त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

बनावट कागदपत्रे कुठून बनविण्यात आली, या सर्व कृत्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, संशयिताकडून रक्कम हस्तगत करायची आहे आदी मुद्दे पोलिस कोठडी मागताना न्यायालयासमोर ठेवले. संशयिताच्या वकिलांनीदेखील आपली बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत न्यायमूर्ती सगडे यांनी संशयिताची पाच दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT