Superintendent of Police Srikant Dhiware, Sub Divisional Police Officer Sajan Sonwane, Assistant Police Inspector Hanumant Gaikwad and the team along with the suspects in the loot case, seized money. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : लूट प्रकरणातील साडेतेरा लाख हस्तगत; टोळीतील तिघे जेरबंद

Dhule Crime : निजामपूर (ता. साक्री) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुझलॉन कंपनीजवळ कॉपर केबल विक्रीचे आमिष दाखवून लुटीच्या घटनेतील साडेतेरा लाख रुपये रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : निजामपूर (ता. साक्री) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुझलॉन कंपनीजवळ कॉपर केबल विक्रीचे आमिष दाखवून लुटीच्या घटनेतील साडेतेरा लाख रुपये रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. चोवीस तासांत घटनेचा छडा लावत पोलिसांनी या प्रकरणी टोळीतील तीन संशयितांनाही जेरबंद केले. (Thirteen lakhs worth of goods seized in robbery three gang members jailed by police )

मुंबई येथील इंजिनिअरिंग वर्कशॉप व्यावसायिक हरीश सुजेश पवार (रा. एन-३०, रोहाउस ०४, सेक्टर-०७, मुंबई) यांना इक्बाल चव्हाण (रा. जामदा, ता. साक्री) व अमित नाईक (रा. नवी मुंबई) यांनी ४४ टन कॉपर केबलचे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांना पेटले (ता. साक्री) गावशिवारातील सुझलॉन कंपनीजवळ कॉपर केबल खरेदी करण्याच्या उद्देशाने बोलविले.

त्यानुसार ते बुधवारी (ता. २९) सर्वेश सोनाळकर, गायत्री सोनाळकर यांच्यासह अंगरक्षक नितीन मोरे, हुकूमसिंग, प्रकाशसिंग, महेश निंबाळकर, शिवाजी गुंजाळ, अरुण विश्वकर्मा असे त्यांच्या दोन चारचाकी वाहनाने पेटले गावशिवारातील सुझलॉन कंपनीजवळ आले. त्या वेळी सुझलॉन कंपनीच्या गेटवर इक्बाल चव्हाण, अनुप शर्मा, अमित नाईक, ज्ञानेश्वर पाटील, मुकेश येंकी पवार, राजेश शंकीलाल पवार व त्यांच्यासोबत अन्य दोन ते तीन जण होते.

त्यांनी हरीश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण, दमदाटी करत सुमारे २२ लाख तीन हजार रुपये रोकड व दोन लाख ५५ हजारांची सोन्याची अंगठी, सोन्याची चेन, घड्याळ, एटीएम कार्ड असा एकूण २४ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जबरीने लुटून नेला. घटनेनंतर हरीश पवार यांनी निजामपूर पोलिस ठाणे गाठत आपबीती सांगितली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला.

तत्काळ तपासाची चक्रे

सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी तपासाची चक्रे फिरवत पथकासह अमित तानाजी नाईक (रा. ऐरोली, नवी मुंबई), अनुप ऊर्फ राज मुन्नालाल शर्मा (रा. उमियानगर, सुरत, गुजरात) व ज्ञानेश्वर धर्मा पाटील (रा. अर्थे, ता. शिरपूर) यांना चोवीस तासांत ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लुटीतील रकमेपैकी १३ लाख ५० हजार रुपये व चार मोबाईल हस्तगत केले. दरम्यान, या घटनेतील अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड, श्री. शेख, श्री. मालचे, श्री. आखाडे, श्री. अहिरे, श्री. चव्हाण, श्री. शिंदे, श्री. पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT