Police during vehicle inspection. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : नाकाबंदीत गांजासह दोघे अटकेत; जिल्ह्यात 63 हजारांचा दंड वसूल

Dhule Crime : जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. ५) सर्व पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात नाकाबंदी आणि ऑपरेशन ऑलआउट राबविण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. ५) सर्व पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात नाकाबंदी आणि ऑपरेशन ऑलआउट राबविण्यात आले. गुरुवारी रात्री अकरा ते मध्यरात्रीनंतर तीनपर्यंत चाललेल्या या मोहिमेत गांजासह दोघांना अटक करण्यात आली. तसेच विविध केसेसमध्ये ६३ हजारांचा दंड वसूल झाला. लळिंग (ता. धुळे) टोलनाक्याजवळ नाशिक येथील दोघांना गांजासह पकडण्यात आले. (Two arrested with ganja in blockade fine )

तसेच जिल्ह्यात २३ ठिकाणच्या नाकाबंदीत १०२ केसेसद्वारे ६३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मोहाडी पोलिस ठाण्यांतर्गत मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग टोलनाक्याजवळ दुचाकी (एमएच १५, एफएक्स ०३७८)ने नाशिककडे जाणाऱ्या दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून एक लाख ५० हजार ६०० किमतीचा मानवी मेंदूवर परिणाम करणारा मादक पदार्थ गांजा आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली. या प्रकरणी निशांत बापू कदम (रा. सातपूर, नाशिक) आणि राहुल सुरेश पाटील (रा. अशोकनगर, नाशिक) याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मोहाडी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील आणि पथकाने केली.

पोलिस अधीक्षक धिवरे यांनी सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी, उपअधीक्षकांना फरार व वॉन्टेड आरोपींना अटक करणे, अवैध शस्त्र शोधणे, अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, हिस्ट्रिशीटर यांची तपासणी करणे, हॉटेल, लॉजेस, धाबे व गुन्हेगारी वस्त्यांची तपासणी, ड्रंक ॲन्ड ड्राइव्ह केसेस करणे, नाकाबंदीतून संशयित वाहनांची तपासणी, वॉरंटची बजावणी, अवैध व्यवसायांवर कारवाई करणे आदी निर्देश दिले. त्यानुसार जिल्ह्यात २३ ठिकाणी नाकाबंदी, ऑपरेशन ऑलआउटद्वारे सहाय्यक पोलिस अधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी, पोलिस उपअधीक्षक भागवत सोनवणे यांनी देखरेख ठेवली. ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे श्री. धिवरे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT