Dhule Crime News : सोनगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १८ जूनला एकाची दुचाकी लंपास झाल्याची घटना घडली. दुचाकीच्या डिक्कीत संबंधिताची रोकड, मोबाईल व अन्य साहित्य होते. चोरीच्या घटनेचा छडा एलसीबीने अवघ्या तीन दिवसात लावून मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यात एका विधिसंघर्षित बालकाचा समावेश आहे. ( Two bike rider arrested Shirpur law abiding child included )
रुणमळी (ता. साक्री, ह. मु. बाभळे, ता. धुळे) येथील नीलेश साहेबराव गायकवाड याने १६ जूनला सकाळी सव्वाअकराच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील सरवड फाट्यानजीक दुचाकी (एमएच १५, एडब्ल्यू ७६४४) उभी केली. नंतर काही कामानिमित्त तो तिथून दुसरीकडे गेला. नेमकी हीच संधी साधून चोरट्याने दुचाकी लंपास केली. दुचाकीच्या डिक्कीत चार हजार ८०० रुपयांची रोकड व दहा हजारांचा मोबाईल होता.
चोरट्याने दुचाकीसह एकूण ४९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी सोनगीर (ता.धुळे) पोलिस ठाण्यात १८ जूनला गुन्ह्याची नोंद झाली. घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करताना पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना ही चोरी संशयित रणजित युवराज कोळी व त्याचा विधिसंघर्षित साथीदार (दोघे रा. शिरपूर) यांनी केल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार दोघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. तसेच दहा हजारांचा मोबाईल, चार हजार ८०० रुपयांची रोकड व एटीएम कार्ड, असा १४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल दिला. ताब्यात घेतलेल्या दोघांना सोनगीर पोलिसांच्या हवाली केले. तथापि, विधिसंघर्षित बालकावर शिरपूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यामुळे दोघा संशयितांकडून आणखी गुन्हे उकल होण्याची शक्यता आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक पवार, अमित माळी, संजय पाटील, संदीप पाटील, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, पंकज खैरमोडे, मायूस सोनवणे, सुरेश भालेराव, अमोल जाधव, हर्शल चौधरी, सुनील पाटील, राजू गिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.