Inspector Nilesh More, Changdeo Handal investigation police personnel arresting the house burglar in Shastri Nagar here. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : घरफोडी करणाऱ्या दोघा संशयित चोरट्यांना अटक; पोलिसांची शास्त्री कॉलनीतील चोरीप्रकरणी कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : येथील शास्त्री कॉलनीतील कापड दुकानदाराच्या घरात दोन दिवसांपूर्वी जबरी चोरी झाली होती. चोरीतील दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ४८ तासांत अटक केली आहे. तसेच ऐक्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान दोन दिवसांची पोलिस कोठडी आरोपींना न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे शहरात झालेल्या इतर चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गुरुवारी (ता.४) राजेंद्र बन्सीलाल जैन यांच्या बंद घरात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. (Two suspected house burglar arrested )

सोन्या-चांदीच्या दाग दागिन्यांसह रोकड रक्कम चोरट्यांनी चोरून नेली होती. सुमारे तीन लाख एकसष्ट हजाराची रुपयांचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांनी दोन दिवसांत जलद चक्रे फिरवून चोरट्यांना शोधण्यात यश मिळविले. संशयित बिलाल युनूस खाटीक (वय २८, रा. राणीपुरा दोंडाईचा), शरद काशिनाथ भिल (वय २१ रा. दोंडाईचा) यांना ताब्यात घेऊन चोरीच्या मालातील पन्नास हजार रुपये किमतीची ५०० ग्रॅम चांदी, तीन ग्रॅम सोने, एलजी कंपनीचा टीव्ही असा एक्क्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक नीलेश मोरे, पोलिस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ, हेमंत राऊत, नकुल कुमावत, हवालदार राजन दुसाने, पुरुषोत्तम पवार, हिरालाल सूर्यवंशी, अनिल धनगर, प्रवीण निकुंभे, अक्षय शिंदे, संदेश बैसाणे आदी पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी ही कारवाई केली.

जार वाटपावेळी रेकी

या गुन्ह्यातील आरोपींसोबत दोन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. बाल न्याय मंडळ येथे त्यांना पाठवले आहे. गुन्ह्यातील मुख्य संशयित बिलाल खाटीक हा पाण्याचे जार वाटप करण्याचे काम करतो. त्यावेळेस तो बंद घरांची माहिती घेतो. त्यानुसार आपल्या साथीदारांसोबत घरफोडी करत असल्याची माहिती पोलिसांना प्रथमदर्शनी लक्षात आली.

त्यानुसार तपास पोलिस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ तपास करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दोन-तीन दिवस घरमालक काही कामानिमित्त घर बंद करून बाहेर गावी जातात. अशाच घरात चोरीच्या घटना घडत असल्याची ओरड नागरिकांची आहे. नेमके घर बंद असल्याची माहिती कशी मिळते. त्याच्या धागा दोरा या घटनेच्या निमित्ताने उलगडून काढला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT