Dhule News : पावसाळा सुरू झाल्यानंतर कीटकजन्य व इतर विविध साथरोगांची लागणही सुरू होते. विशेषतः डासांचे प्रमाण वाढल्यानंतर डेंगी, मलेरियाचा प्रादुर्भाव सुरू होतो. या पार्श्वभूमीवर धुळे महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जातात. त्याची तयारी सध्या सुरू करण्यात आली आहे.
सद्यःस्थितीत घरोघरी जाऊन नागरिकांना डेंगी, मलेरिया होऊ नये यादृष्टीने जनजागृती करण्यावर भर आहे. दरम्यान, साधारण १ जूनपासून फवारणी, धुरळणी, ॲबेटिंग आदी उपाययोजना सुरू होतील. यासाठी आवश्यक औषधे, अळीनाशक, कीटकनाशकांची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Dhule public awareness by Municipal Malaria Department)
धुळे शहरात पावसाळ्यात आपत्कालीन स्थिती उद्भवू नये यासाठी पावसाळ्यापूर्वी विविध कामे, उपाययोजना करण्यास सुरवात करण्यात आली आहे. त्यादृष्टीने मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यानंतर विविध आजारांचे प्रमाणही वाढते.
विशेषतः कीटकजन्य आजारांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. डेंगी, मलेरियाचा प्रादुर्भाव पावसाळ्यानंतरही अगदी डिसेंबरपर्यंत पाहायला मिळतो. त्यामुळे डेंगी, मलेरिया नियंत्रणासाठी महापालिकेतर्फे दर वर्षी विविध उपाययोजना केल्या जातात.
२०२१ मध्ये महापालिकेने एकात्मिक डास निर्मूलन कार्यक्रमासाठी तब्बल १४ कोटी २५ लाखांचे टेंडर तीन वर्षांसाठी एका खासगी संस्थेला दिले होते. तक्रारी, आरोपांनंतर फेब्रुवारी-२०२२ मध्ये संस्थेचे काम बंद करण्यात आले. नंतर महापालिका स्तरावरून हे काम काही लाखात झाले. या वर्षीदेखील महापालिका स्तरावरून हे काम करण्यात येणार आहे. (latest marathi news)
औषध खरेदीसाठी निविदा
डास निर्मूलनासाठी फवारणी, धुरळणी, ॲबेटिंग आदी उपाययोजना केल्या जातात. यासाठी लागणारी औषधे, अळीनाशके, कीटकनाशके यापूर्वी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होत होती. या वर्षी शासनाकडून ते उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे महापालिकास्तरावरून हा औषधसाठा खरेदी करणार आहे.
त्यासाठी महापालिकेकडून निविदा काढण्यात आली आहे. केमोफॉस- १००० लिटर, पॅराथ्रॉन- १०० लिटर, बीटीआय पावडर- २००० किलोग्रॅम, एमएलओ ऑइल- १००० लिटर आदी खरेदी करण्यात येणार आहे. साधारण १ जूनपासून शहरात फवारणी सुरू केली जाईल, असे मलेरिया पर्यवेक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले. दरम्यान, विविध उपाययोजनांसाठी महापालिकेकडे मनुष्यबळ उपलब्ध नाही. हे मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणार आहे.
दोन कोटी अनुदान बाकी
दरम्यान, नागरी हिवताप निर्मूलन योजनेंतर्गत राज्य शासनाकडून दर वर्षी औषधे, कीटकनाशकांसह मनुष्यबळासाठी अनुदान दिले जाते. मागील दोन वर्षांचे सुमारे दोन कोटी रुपये अनुदान अद्याप महापालिकेला मिळालेले नाही. अनुदान मागणीचा प्रस्ताव महापालिकेकडून डीएमओ ऑफिसला पाठविण्यात आला आहे. हे अनुदान प्राप्तही प्राप्त होईल, अशी महापालिकेला अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.