Dhule News : नव्या शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीच्या शाळांसाठी प्रत्येक महिन्याला शिक्षण परिषद होत असते. शिक्षण परिषद केंद्रस्तरीय तसेच बीटस्तरीयही होणार आहेत. परिषदेदरम्यान होणाऱ्या भोजनावळीही बंदचा निर्णय झाला असून सकाळी सात ते अकरा शाळा आणि बारा ते साडेतीन परिषद होणार आहेत. या नियोजनाप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रस्तरीय पहिली परिषद झाली. या निर्णयाचे शिक्षकांसह पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. (decided to close lunche during conference )
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु झाले. वर्षाची पहिली शिक्षण परिषद विविध केंद्रात झाली. यात यंदापासून आमूलाग्र बदल झाले आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे यांनीच विशेष मार्गदर्शन केल्याचे शिक्षकांमधून सांगण्यात आले. यंदापासून शिक्षण परिषद आनंददायी सुरु झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
भोजनावळी
पूर्वीचे गटसंमेलन आणि आताच्या शिक्षण परिषदा एकच होत्या. चर्चा कमी आणि टाइमपास अधिक होता. मधल्या वेळेत तर विशेष मेनू ठेवून भोजनावळी सुरु व्हायच्या. यात कोणते केंद्र अव्वल अशी खमंग चर्चाही व्हायची. यंदापासून भोजनावेळी बंदचे तोंडी आदेश संबंधितांना दिले आहेत.
शाळा अन परिषदही
परिषदेच्या दिवशी सकाळी सात ते अकरा शाळा असणार आहे. बारा ते साडेतीन शिक्षण परिषदेचे नियोजन झाले आहे. यामुळे सायंकाळी पाचपर्यंत रेंगाळण्याऐवजी शिक्षकांची लवकर सुटका होणार आहे. (latest marathi news)
बीटस्तरीय परिषद
पूर्वी शिक्षण परिषदा प्रत्येक केंद्रस्तरीय व्हायच्या. आता केंद्रासह बीटस्तरीयही परिषद होणार आहेत. जुलैमध्ये बीटस्तरीय संमेलन होणार आहे. परिषदांमध्ये शिक्षकांना भरीव प्रशिक्षण मिळणार आहे.
आता खासगी शाळांना बंधनकारक
पहिली ते आठपर्यंतच्या खासगी शाळेतील शिक्षकांनाही शिक्षण परिषद बंधनकारक झाली आहे. बीटस्तरीय संमेलनात त्याचा सहभाग होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
कापडणे केंद्रशाळेत शिक्षण परिषद
येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा एक व कन्या शाळा क्रमांक दोनमध्ये शिक्षण परिषद झाली. यावेळी गट शिक्षणाधिकारी विठ्ठल घुगे, शालेय पोषण आहार अधिक्षक सोनार, शिक्षण विस्तार अधिकारी भारती भामरे, मुख्याध्यापक रामराव पाटील, मुख्याध्यापक शरद चौधरी, छाया सूर्यवंशी, रत्नप्रभा पाटील, अर्चना वाणी, ज्योत्स्ना पाटील, जागृती खैरनार, भाग्यश्री भामरे, रूपाली पाटील, वैशाली पाटील, वैशाली बोरसे, विजय पाटील, ज्योती सोनार आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.