BJP  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election : काँग्रेसद्वयींच्या भांडणात भाजपचा लाभ! धुळे लोकसभा मतदारसंघात 42 वर्षांनी विजयी `एन्ट्री

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील आतापर्यंत झालेल्या निवडणुकांना अनेक कंगोरे आहेत. पैकी १९९९ मधील निवडणूक वैशिष्टपूर्ण ठरली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील आतापर्यंत झालेल्या निवडणुकांना अनेक कंगोरे आहेत. पैकी १९९९ मधील निवडणूक वैशिष्टपूर्ण ठरली. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात भाजपला विजय मिळला आणि या पक्षाची मतदारसंघात `एन्ट्री` झाली. मतदारसंघाच्या फेरपुनर्रचनेनंतर २००९ पासून त्यावर भाजपने ताबा मिळविला आहे. त्यामुळे सध्या होऊ घातलेली निवडणूक भाजपसाठी अती प्रतिष्ठेची असेल. (Dhule dispute between Congress and NCP BJP advantage and party entered constituency)

काँग्रेसचे प्राबल्य राहिलेल्या लोकसभेच्या धुळे मतदारसंघात १९५७ मध्ये जनसंघातर्फे उत्तमराव पाटील यांना खासदारकीची संधी मिळाली. नंतर भाजपला या मतदारसंघात `एन्ट्री` करण्यासाठी तब्बल ४२ वर्षे वाट पाहावी लागली. या पक्षाचे रामदास रूपला गावित यांनी १९९९ मधील निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बापू चौरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डी. एस. अहिरे यांचा पराभव करीत विजय मिळविला होता.

नेमके काय घडले?

देशातील सत्ता संघर्षातून शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी लोकसभा निवडणुका होत्या. तत्पूर्वी, प्रांताधिकारी पदाचा राजीनामा देऊन समाजकारण, राजकारणात आलेले डी. एस. अहिरे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

त्यामुळे लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील काँग्रेसची जागा रिकामी झाली. या कालावधीत लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका होत्या. काँग्रेसच्या आग्रहामुळे विधानसभेचे साक्रीतील उमेदवार बापू चौरे यांना लोकसभेची उमेदवारी करावी लागली आणि डी. एस. अहिरे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार झाले. (latest marathi news)

अन्‌ तिसऱ्याला लाभ

भाजपने रामदास गावित यांना उमेदवारी दिली. तिरंगी लढतीत श्री. अहिरे यांनी एक कल्पना लढविली. साक्री विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार वसंत सूर्यवंशी यांचे निवडणुकीत चिन्ह खुर्ची होते. पडद्याआडून श्री. अहिरे यांनी लोकसभा निवडणुकीत धुळे तालुक्यातून एका आदिवासी उमेदवाराला उभे केले आणि त्याला खुर्ची हे चिन्ह मिळवून घेतल्याची चर्चा तेव्हा लपून नव्हती.

परिणामी, लोकसभा निवडणुकीच्या बॅलेट पेपरवर काँग्रेसचे उमेदवार चौरे यांचे चिन्ह पंजा आणि त्याखाली अपक्ष आदिवासी उमेदवाराचे चिन्ह खुर्ची आले. त्यामुळे मतदारांनी पंजा आणि खुर्ची, अशा दोन्ही चिन्हांवर शिक्का मारल्याचे काँग्रेस उमेदवाराच्या लक्षात आले. त्यातून १६ हजार मते बाद झाली, श्री. चौरे हे बारा हजार, तर श्री. अहिरे ४४ हजार मतांनी पराभूत झाले.

या दोघांच्या भांडणात भाजपचे उमेदवार गावित विजयी झाले. मत विभाजनामुळे भाजपला या मतदारसंघात `एन्ट्री` करता आली. या संधीचे सोने करत भाजपने नंतर २००९ पासून लोकसभेचा धुळे मतदारसंघ ताब्यात ठेवला आहे. आता होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपला संधी मिळते किंवा कसे याची सर्वांनाच उत्सुकता असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT