दोंडाईचा : येथील लेंडूर नाल्याला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी पाहणी केली. तसेच पूरग्रस्तांना त्यांच्या घरी जात आर्थिक मदतीचे वाटप केले. दोंडाईचा व परिसरात तीन दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस झाला होता. त्यामुळे भोगावती नदी व लेंडूर नाल्याला पूर आला होता. (Distribution of financial assistance to flood victims in Dondaicha)
यात लेंडूर नाल्यालगत सुमारे ५० घरांची वस्ती आहे. या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. या रस्त्याखालून लेंडूर नाला वाहतो. नाल्याला पूर आल्याने व निचऱ्यासाठी पुरेशी जागा नसल्याने नाल्यालगत असलेल्या सरासरी ३० ते ३५ घरांमध्ये पाणी शिरले. त्यात त्यांच्या संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. कपडे, भांडे वाहून गेले. धान्याचे नुकसान झाले. अशा पूरग्रस्तांना आमदार रावल यांच्या हस्ते प्रत्येकी पाच हजारांची मदत प्रदान झाली.
यंत्रणेकडून पंचनामा
पूरग्रस्त भागात तहसील कार्यालयाने पंचनामा केला असून, याद्वारे शासनाकडूनही पूरग्रस्तांना लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तहसीलदार, तलाठ्याला योग्य ती सूचना देण्यात आली आहे, असे सांगत आमदार रावल यांनी पूरग्रस्त भागाची, रेल्वेपूल बांधकामासह त्याखालील भागाची पाहणी केली. (latest marathi news)
पुन्हा अशी समस्या निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक ती कार्यवाही संबंधित अधिकाऱ्यांनी करावी, अशी सूचना दिल्याचेही आमदार रावल यांनी सांगितले. माजी उपनगराध्यक्ष नबू पिंजारी, नगरसेवक निखिल जाधव, माजी नगरसेवक कृष्णा नगराळे.
जितेंद्र गिरासे, भरतरी ठाकूर, नरेंद्र गिरासे, किशन दोधेजा, चंद्रकला सिसोदिया, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन मराठे, देवा पाटील, राजू धनगर, संदीप धनगर, मुकेश देवरे, मनोहर कापुरे, विराज गिरासे, मंडळाधिकारी व तलाठी उपस्थित होते.�
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.