Dhule Lok Sabha Election : लोकसभा मतदारसंघाची निवडणूक घोषित झाल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या मतदारसंघात १९ लाखांवर मतदारांची नोंद झाली असून यंदा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निरनिराळे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शनिवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत दिली. (Dhule district collector Abhinav Goyal statement 19 lakh voters registered in constituency)
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे- पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके आदी उपस्थित होते. यावेळी श्री. गोयल म्हणाले, की केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघासाठी २० मेस मतदान, तर ४ जूनला मतमोजणी होणार आहे. निवडणूक घोषित होताच जिल्ह्यात तत्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची २६ एप्रिलला अधिसूचना प्रसिद्ध होईल. उमेदवारांना ३ मेपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करता येईल.
चार मेस छाननी, सहा मेस माघारीची मुदत असेल. नंतर निर्धारित कालावधीत मतदान, मतमोजणी होईल. धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण, असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. (latest marathi news)
मतदारांची स्थिती
धुळे जिल्ह्यात १८ ते २३ वयोगटातील १७ हजार ३२१ नवीन मतदारांची नोंद झाली आहे, तर ८५ वर्षांवरील वयोगटातील मतदारांची संख्या २३ हजार आहे. जिल्ह्यात १० हजार ९०० मतदार हे दिव्यांग असून आवश्यकतेनुसार त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
तसेच मतदान केंद्रावर त्यांच्या सोईसाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यात १ हजार ७०४ मतदान केंद्र राहणार असून ५४ मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत. त्याठिकाणी वेबकॉस्टिंगची व्यवस्था होणार आहे. आयोगाच्या सूचनेनुसार ५० टक्के मतदान केंद्रावर वेबकॉस्टिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.
सेक्टर अधिकारी नियुक्त
जिल्ह्यात सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर बैठे व फिरते पथक कार्यान्वित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील १७ लाख २७ हजार ४७६ मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील. धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे ग्रामीणमध्ये ३ लाख ८७ हजार ९५५ .
धुळे शहर ३ लाख ३४ हजार ५१०, शिंदखेडा ३ लाख २७ हजार २५५, मालेगाव मध्य २ लाख ९६ हजार २, मालेगाव बाह्य ३ लाख ५३ हजार ६७०, तसेच बागलाण मतदारसंघात २ लाख ८४ हजार ३३१, असे एकूण १९ लाख ८३ हजार ७२३ मतदार आहेत, असे श्री. गोयल म्हणाले. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलिस विभागाने आखलेल्या बंदोबस्त आराखडा व नियोजनाची माहिती दिली.
मतदानासाठी जनजागृतीवर भर
आदर्श आचारसंहितचे अनुषंगाने शासकीय जागेवरील बॅनर, पोस्टर काढण्यात येवून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यावर्षी मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपद्वारे मोठया प्रमाणात जिल्हाभरात विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे.
मागील निवडणुकीत ज्या ठिकाणी कमी मतदान झाले होते, अशा ठिकाणी मेळावे, कार्यक्रम, पथनाट्य, शाळा व कॉलेजमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन श्री. गोयल यांनी केले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.