Preparations going on at police drill ground for district police force recruitment. Superintendent of Police Shrikant Dhiware during the inspection in the second photo esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule District Police Recruitment: मैदानी चाचणीवर CCTV, व्हिडिओग्राफीद्वारे ‘वॉच’! 19 ते 23 जूनदरम्यान प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

Dhule District Police Recruitment : जिल्हा पोलिस दलातील ५७ पदांच्या भरतीसाठी १९ ते २३ जूनदरम्यान येथील पोलिस कवायत मैदानावर मैदानी चाचणी होईल. ही भरतीप्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी होणार आहे. मैदानी चाचणीवर सीसीटीव्ही, व्हिडिओग्राफीद्वारे वॉच राहील. भरती प्रक्रियेतील उमेदवारांसाठी प्रथमच बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.

या संपूर्ण भरतीप्रक्रियेवर चारशे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लक्ष असेल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. पोलिस भरतीसाठी कुणी प्रलोभन देत असेल तर त्याबाबत तत्काळ उपस्थित वरिष्ठांशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. धिवरे यांनी केले. (Dhule District Police Recruitment Watch by CCTV)

धुळे जिल्हा पोलिस भरती प्रक्रियेसंदर्भात पोलिस अधीक्षक धिवरे यांनी पोलिस कवायत मैदानावर पत्रकार परिषद घेतली. अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, गृह शाखेच्या डीवाएसपी शिल्पा पाटील, मुकेश माहुळे, श्री. चौधरी, राजेसाहेब पटेल, सिदाआप्पा गवळी आदी उपस्थित होते.

श्री. धिवरे म्हणाले, की या भरतीत ५७ पदांसाठी एकूण दोन हजार ४७५ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यात एक हजार ९०३ पुरुष, २६ माजी सैनिक व ५४६ महिला उमेदवारांचा समावेश आहे. पोलिस भरतीसाठीची मैदानी चाचणी १९ ते २३ जून अशी पाच दिवस घेतली जाईल. प्रत्येक दिवशी ५०० उमेदवारांची चाचणी होईल.

चाचणीचे स्वरूप असे

पहाटे पाचला मैदानी चाचणीला सुरवात होईल. उंची, छाती मोजणे त्यानंतर कागदपत्रांची पडताळणीने होईल. त्यानंतर मैदानी चाचणीला सुरवात होईल. शेवटच्या दिवशी अर्थात २३ जूनला महिला उमेदवारांची चाचणी प्रक्रिया होईल. मैदानी चाचणी ५० गुणांची असून, यात १०० मीटर, एक हजार ६०० मीटर धावणे, गोळाफेक असे इव्हेंट होतील. (latest marathi news)

मैदानी चाचणीत किमान ५० टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांमधून प्रवर्गनिहाय एकास दहा या प्रमाणानुसार लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना पात्र ठरविण्यात येईल. लेखी परीक्षा १०० गुणांची व मराठीत होईल. परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असून, यात अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी व मराठी व्याकरणाचा समावेश आहे.

लेखी परीक्षा ओएमआर पद्धतीने घेण्यात येणार आहे. यात ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र ठरतील. दरम्यान, भरतीच्या दिवशी पाऊस आल्यास व मैदानी चाचणी घेणे शक्य नसल्यास त्या दिवसाची भरती स्थगित ठेवून पुढील तारखेचे नियोजन करण्यात येईल.

त्यांच्याकडून लेखी हमी

भरती प्रक्रियेसाठी नियुक्त पोलिस अधिकारी, अंमलदार यांचे नातेवाईक, परिचयाचे उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी नाहीत याबाबतचे लेखी त्यांच्याकडून घेण्यात आले असून, या अधिकारी-कर्मचाऱ्यांना भरती प्रक्रियेदरम्यान मोबाईल फोन न वापरण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या असल्याचे श्री. धिवरे म्हणाले. पोलिस भरतीच्या वेळी पोलिस दलाकडून उमेदवारांना पिण्याचे पाणी, डॉक्टरांची टीम, अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेनंतर पोलिस अधीक्षक धिवरे यांनी भरती प्रक्रियेच्या तयारीची पाहणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबचा रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Updates : लाडकी बहीण योजनेसाठी गडबड करु नका- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT