धुळे : मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याअंतर्गत न्यू धुळे रेल्वेस्थानकाचे कामही सुरू झाले आहे, अशी माहिती माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. भामरे यांनी पत्रकारांसोबत या रेल्वेमार्गाच्या कामाची रविवारी (ता. ६) पाहणी केली. या रेल्वेमार्गाच्या कामाबाबत डॉ. भामरे यांनी त्यांच्या पारोळा रोडवरील राम पॅलेस येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत माहिती दिली. ()
भाजपचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, बबनराव चौधरी, हिरामण गवळी, प्रा. अरविंद जाधव यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर पाच वर्षांपूर्वी मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्याला परवानगी मिळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करून घेतले. दोन वर्ष भूसंपादनात गेले व चार महिन्यांपूर्वी कामाचे टेंडर निघाले. एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग ली. कंपनीला हे टेंडर मिळाले.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काहीकाळ हे काम थांबले होते; मात्र आता पुन्हा काम सुरू करण्यात आले आहे, असे डॉ. भामरे म्हणाले. २ सप्टेंबर २०२४ ला केंद्रीय मंत्रिमंडळाने या रेल्वेमार्गासाठी १८ हजार ३६ कोटी रुपये मंजूर केले. तीन वर्षांत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण केले जाईल. टप्प्याटप्प्याने भूमीअधीग्रहण करून २०२९ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश असल्याचेही डॉ. भामरे म्हणाले.(latest marathi news)
सहा रेल्वेस्थानक
धुळे शहरापासून थोड्याच अंतरावर न्यू धुळे रेल्वेस्थानकाचे कामही सुरू झाले आहे. धुळे नरडाणा ही नवीन B4 धुळे ( बोरविहीर) ते नरडाणा साधारणतः ४९.४५ किलोमीटर आहे. आणि ईपीसी मोडवर त्याचे काम सुरू राहील. एकूण ७४० कोटी रुपयांचे हे काम साधारणतः ३० महिन्यांत होणे अपेक्षित आहे. धुळे ते नरडाणादरम्यान सहा रेल्वेस्थानक असतील. यात दोन यापूर्वीचे व चार नवीन असतील. बोरविहीर, न्यू धुळे, निमखेडी, कापडणे, सोनगीर व नरडाणा अशा सहा रेल्वेस्थानकांचा यात समावेश आहे.
स्वप्नपूर्ती होईल
सुलवाडे-जामफळ योजनेसाठी २४६० कोटी रुपये आणले. या योजनेतील नऊ टीएमसी क्षमतेचे जामफळ धरणाचे काम सोनगीरजवळ सुरू आहे. शेतीसह उद्योगाला यातून पाणी उपलब्ध होईल. केंद्र सरकारने डीएमआयसीच्या दुसऱ्या फेजमध्ये धुळ्याची निवड केली आहे. त्यात फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला प्राधान्य आहे. येत्या काळात इथेनॉलचे कारखाने मोठ्या प्रमाणात आपल्या भागात येतील. त्यामुळे एकूणच चित्र पाहता गेल्या ६० वर्षांपासून जे स्वप्न बघितले त्याची स्वप्नपूर्ती होईल, असा विश्वास डॉ. भामरे यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.