Desilting work in progress. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Drought News : पाणीसाठा टिकण्यासाठी पदरमोड गाळ उपसा; भविष्यातील पाणी टंचाईवर पर्याय

Dhule News : यंदा तीव्र दुष्काळ, टंचाईची जाणीव सर्वच घटकांना होत आहे. तालुक्यात सर्वच ठिकाणच्या सिमेंट बंधाऱ्यात साठ टक्के गाळ साचला आहे. यंदा पाण्याची निकड शेती व्यवसायासह सर्व घटकांना बसली आहे.

दगाजी देवरे : सकाळ वृत्तसेवा

म्हसदी : यंदा तीव्र दुष्काळ, टंचाईची जाणीव सर्वच घटकांना होत आहे. तालुक्यात सर्वच ठिकाणच्या सिमेंट बंधाऱ्यात साठ टक्के गाळ साचला आहे. यंदा पाण्याची निकड शेती व्यवसायासह सर्व घटकांना बसली आहे. देऊर रस्त्यावरील विश्वेश्वर मंदिराजवळील सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी उपसरपंच चंद्रकांत देवरे धावून आले. (Dhule Drought Drainage of silt to sustain water storage)

पदरमोड करत जेसीबी यंत्राद्वारे गाळ काढण्यात आला. भविष्यात या बंधाऱ्यात पाणीसाठा टिकून राहील असा विश्वास त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला आहे. यंदा नैसर्गिक आपत्तीमुळेच नाही तर शासनाच्या उदासीनतेमुळे दुष्काळाच्या झळा अधिकच गडद होत असल्याचे चित्र आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात तालुक्यात अनेक ठिकाणी सिमेंट बंधारे बांधले.

वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम होता. यामुळे अनेक गावांत जलस्तरही वाढला होता. परंतु यंदा एखादाही जोरदार पाऊस झाला नाही. परिणामी यंदा पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. शासनाने गाळमुक्त धरण अशी अभिनव योजना आणली होती. शासनाच्या अनेक योजना कल्याणकारी असतात यात शंकाच नाही.

पण राबविणारी यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी चांगले असले तर शासकीय योजनांचा फायदा तळागाळापर्यंत हमखास जाऊ शकतो. गाळमुक्त धरण योजनेत शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चात गाळ काढून न्यावा अशी तरतूद होती. त्याच पार्श्वभूमीवर उपसरपंच चंद्रकांत देवरे यांनी भविष्याची गरज ओळखत सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढला आहे. (latest marathi news)

स्वत:च्या शेतात गाळ वाहून नेला आहे. गाळ शेतीस उपयुक्त असल्याची माहिती श्री. देवरे यांनी दिली. शासनाच्या मदतीची अपेक्षा न ठेवता जेसीबी यंत्राद्वारे नाला खोलीकरणही केले आहे. सिमेंट बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाण्याची पातळी टिकत नसल्याचे वास्तव आहे.

अमरावती नदीपात्रातील बंधाऱ्यातील गाळ काढत भविष्यातील पाणी टंचाईवर पर्याय शोधला असून यंदा पाऊस झाल्यावर बंधाऱ्यातील गाळ काढल्यामुळे नजीकच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यातून परिसरातील जमीन ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे.

इतरत्रही अशा उपक्रमाची गरज

यंदा लोकसहभाग घडवत प्रत्येक शिवारात शेतकऱ्यांनी सिमेंट बंधाऱ्याची दुरुस्ती व गाळ काढण्याचे काम करणे गरजेचे आहे. लहरी निसर्गामुळे नव्याने यापेक्षा भयंकर संकट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हसदीसह सोळा गाव काटवान परिसराला सततच्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर होरपळून निघाला आहे. दुसरीकडे दुष्काळाबाबत शासकीय यंत्रणा पाहिजे तेवढे गांभीर्य घेत नसल्याचे चित्र आहे. पाणी, चारा टंचाई अभावी पशुधनाची अवस्था अत्यंत वाईट आहे.

"दिवसेंदिवस दुष्काळाचे सावट अधिकच गडद होत आहे. दरवर्षी मुबलक पाण्यामुळे पाणी वाहून जात होते. यंदा तर एकदाही जोरदार पाऊस झाला नाही. लघु प्रकल्प, सिमेंट बंधारे कोरडेठाक असून प्रचंड गाळ साचला आहे. गाळ काढल्यावर भविष्यात पाणी साठून जलस्तर वाढू शकतो." - चंद्रकांत देवरे, उपसरपंच, म्हसदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Latest Maharashtra News Updates live : महाराष्ट्रात चोरांचे सरकार,मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT