म्हसदी : यंदा दुष्काळामुळे खरिप, रब्बी हंगामासह आज फळबागाचीही वाताहत झाली आहे. वारंवार शेतीतील उत्पन्नापासून शेतकरी वंचित असून, हताश होत असताना मानसिक, आर्थिक आधार न मिळाल्याने कर्जबाजारीपणा वाढला आहे. यंदा सर्वच बाजूंनी शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. (Dhule Drought Rabi Kharif season Disappoints Farmers)
दुष्काळाची दाहकता वाढत असताना आहे त्या शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला जावा, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे. भविष्यात शेतकरी वर्ग हताशपणे वाममार्गाला लागणार नाही, यासाठी प्रशासनाने प्रामाणिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. शेतीसाठी वाढीव खर्च करूनही हाती काही लागत नाही.
यंदा साक्री तालुक्यात खरिप, रब्बी हंगामाने पूर्णतः निराशा केली आहे. केवळ कांदा पीक मोठ्या मेहनतीतून हाती लागले आहे. पिकवून हमीभाव नाही. यंदा तर पपई, टरबूज, खरबूजसारख्या पिकांनी मोठी निराशा केली आहे. तिन्ही पिकांचा खर्चदेखील निघू शकणार नाही. मग अशावेळी कोणती शेती करावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शासनाने जाहीर केलेले मदतीचे पॅकेजही मृगजळ ठरणार आहे. मग, शेतकरी जगेल कसा हा खरा प्रश्न आहे. शासनाच्या मदतीपेक्षा शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याची व्यवस्था व्हावी. ती झाली तरच दुष्काळात बळीराजा सावरणार आहे. अन्यथा, शेतकरी आत्महत्येसारखे मार्ग निवडू शकतो. (Latest Marathi News)
हमी भाव कमी मिळणार?
शेती बेभरवशाची होत चालल्याने उत्पन्नाची हमी नाही. मिळाले तर त्याला भावाची हमी नाही. पीक एकत्र निघते. त्यामुळे ते लवकरात लवकर विकून देण्याला शेतकऱ्यांचे प्राधान्य असते. त्यामुळे बाजारात आवक एकत्रच होते. सध्या उन्हाळ कांद्याची अवस्था तीच आहे. आवक वाढल्याचे कारण दाखवून व्यापारी भाव पाडतात अन् शेतकरी हताश होण्यापलिकडे काहीही करूच शकत नाही. ही आपल्याकडील व्यवस्थाच शेतकऱ्यांना कर्जबाजारीपर्यंत नेते.
पाण्यासारखा पैसा होतोय खर्च
अलिकडे पारंपरिकऐवजी आधुनिक शेतीकडे शेतकरी वळले आहेत. म्हणून शेतीत पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. दुसरीकडे शेतीचे नुकसान ठरलेलेच असते. यंदा दुष्काळाने भर घातली आहे. अशावेळी स्थानिक बँकानी पीककर्ज देण्यासाठी हात आखडता घेतला आहे. खरिप, रब्बी पिकांसह फळबागांसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. यात लागवड, पेरणीपासून निंदणी, आंतरमशागत, काढणीपर्यंत मोठा खर्च करावा लागतो.
"अलिकडे पिकवणे सोपे, विकणे अवघड झाले आहे. फळपिके तत्काळ विकणे आवश्यक असते. यंदा पपईने मोठी निराशा केली आहे. पपईसारख्या फळ पिकांसाठी शासनाचे विमा संरक्षण नाही. तथापि, पपई काढून जास्त दिवस ठेवता येत नाही. शेतकरी पिकवतो आणि व्यापारी दर ठरवतो हेच दुर्दैव आहे." - भटू बेडसे, फळबागायतदार शेतकरी, ककाणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.