farmer Water scarcity tension esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: एकोणीसशे बहात्तरपेक्षा वाईट परिस्थिती शे..! शेतकरी, पशुपालकांच्या भावना; पाणी, चाराटंचाईमुळे दुग्धव्यवसाय अडचणीत

Dhule News : शेती व्यवसाय मोडकळीस निघाल्याने बाहेरून चारा आणून जनावरांच्या पोटाची आग विझविली जात आहे. चारा, पाणी समस्येमुळे दुग्धव्यवसाय अडचणीत सापडला आहे

दगाजी देवरे

म्हसदी : यंदाच्या दुष्काळाचा सामना शेतकरी, पशुपालकांना नकोसा झाला आहे. दुष्काळी स्थिती, वाढत्या उन्हामुळे पाणी, चारा समस्या जटिल झाली आहे. कधी एकदा वरुणराजा बरसेल आणि सर्वच समस्यांपासून मुक्तता मिळेल, अशी अपेक्षा बळीराजा, पशुपालक बाळगून आहेत.

शेती व्यवसाय मोडकळीस निघाल्याने बाहेरून चारा आणून जनावरांच्या पोटाची आग विझविली जात आहे. चारा, पाणी समस्येमुळे दुग्धव्यवसाय अडचणीत सापडला आहे. ‘माणूस जसा तसा दिन काढी ली, पण मुका प्राणीसनं काय, कोल्ला चारा सरी ग्या, हिरवा मिळणं अवघड शे. आते ढोरेसनं कसं व्हई, पुढारी मंडई इलेक्शन मा गुतेल सेत... १९७२ पेक्षा वाईट परिस्थिती शे’ अशा शब्दात साक्री तालुक्यात शेतकरी, पशुपालक भावना व्यक्त करत आहेत. (Dhule Dshortage of water fodder dairy farming in trouble)

खरिपात फक्त कोरडा चारा हाती

खरीप हंगामात कोरडवाहू क्षेत्रात तृणधान्यातील बाजरी, मका, ज्वारी तर कडधान्याची पेरणी केली जाते. तृणधान्य, कडधान्ये पिकांचा चारा उन्हाळाभर जनावरांना उपयोगी पडतो. यंदा अत्यल्प पावसामुळे तृणधान्य, कडधान्य पिकांची अपेक्षित वाढ झाली नाही.

अंतिम चरणात शेतकऱ्यांवर केवळ कोरडा चारा गोळा करण्याची वेळ आली होती. तृणधान्यातील पिकांचा कडबा, कडधान्याचे कुटार जनावरांना पोषक असते. शिवाय रब्बीतील गहू, हरभरा पिकाचा चाराही टंचाई काळात उपयोगी पडत असल्याने नवीन पावसाळा सुरू होईपर्यंत पशुपालक, शेतकरी बिनधास्त राहतात.

रब्बी हंगामातील पिकासह हिरव्या चाऱ्यासाठी मका, खोंडे, दादर आदींची हमखास पेरणी करतात. यंदा रब्बीपासून दुरावलेले शेतकरी, पशुपालक हिरव्या चाऱ्यापासून वंचित राहिले आहेत. चारा समस्या अधिकच गंभीर बनत चालली आहे.

संग्रही केलेला चाराही संपुष्टात

साक्री तालुक्यात जलस्तर खालावल्याने शेती व्यवसायासह दुग्धव्यवसायही अडचणीत सापडला आहे. दुष्काळामुळे पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पशुपालक मिळेल तेथून वैरण विकत आणत आहेत. त्यासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम त्यांना मोजावी लागत आहेत. सर्वांनाच आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

तो केव्हा बरसणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. विहिरींनी तळ गाठल्याने हिरवा चारा नवीन तयार करणे अशक्य. किंबहुना उन्हाळ्यात साठविलेला चाराही संपुष्टात येत आहे. वैरण नसल्याने जनावरांना टाकावे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यात दुभत्या जनावरांचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. वैरण मिळत नसल्याने शेतकरी भाकड जनावरांची विक्री करण्याच्या विचारात आहेत. (latest marathi news)

पाळीव जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न

पाळीव जनावरांना वेळेवर पुरेसा हिरवा चारा व पाणी मिळाले नाही तर अनेक आजार बळावू शकतात, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी देतात. यंदा मुबलक चाराच नाही तर काही ठिकाणी वेळेवर मुक्या जीवांना पाणी देणे अवघड होत असल्याचे वास्तव आहे.

अशा वेळी पशुपालक लांब अंतरावर जाऊन जनावरांची तृष्णा भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. दुभत्या जनावरांना वेळेवर पुरेसा हिरवा चारा व पाणी उपलब्ध करून द्यावे लागते. अशा वेळी अधिकचे पैसे खर्च करून पशुपालक दुभती जनावरे सांभाळत आहेत.

भूजल पातळी प्रचंड खालावल्याने पाणीप्रश्न जटिल झाला आहे. कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. विहिरी कोरणे, आडवे-उभे बोअर लावणे यांसारखे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. आडात नाही तिथे पोहऱ्यात कुठून येणार अशी अवस्था असल्याने प्रत्येक घटक अडचणींचा सामना करत आहे.

"पाणी, चारा नसेल तर दुभती जनावरे सांभाळणे अवघड असते. यंदा दुभती जनावरे सांभाळणे अवघड होत असताना भाकड जनावरे विकण्याची वेळ आली आहे. भविष्यात अशीच दुष्काळी स्थिती, चारा, पाणी समस्या असेल तर ग्रामीण भागातील शेतीला जोडधंदा असलेला दुग्धव्यवसायही नामशेष होण्याच्या शक्यता आहे."-भटू खैरनार, पशुपालक शेतकरी, म्हसदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT